आरोग्यनामा ऑनलाइन टीम – अनेक जण जेवताना टीव्ही पहातात. काही घरांमधून तर कुटुंबातील सर्व सदस्यच जेवण करताना टीव्ही पाहतात. परंतु, टीव्ही सुरू केल्याशिवाय जर तुम्ही जेवू शकत नसाल तर तुम्हाला वेळीच सतर्क व्हावे लागेल. कारण ही सवय आरोग्यासाठी अतिशय हानिकारक असल्याचे संशोधकांनी म्हटले आहे. यामुळे कोणते दुष्परिणाम होतात, याविषयी आपण माहिती घेणार आहोत.
हे आहेत दुष्परिणाम
* मेटाबॉलिज्मची प्रकिया मंद झाल्याने शरीरात फॅट जमा होते. लठ्ठपणाची समस्या वाढते.
* टीव्ही पाहताना जेव्हा एखादी जाहीरात येते तेव्हा खाण्याची इच्छा तीव्र होत असते. याकारणाने थोड्या-थोड्या वेळाने भूक लागते.
* टीव्ही पाहण्यात मग्न झाल्याने आपण किती प्रमाणात खातो हे लक्षात येत नाही. यामुळे पोटाच्या तक्रारी वाढतात.
* आपण टीव्ही पाहताना आपल्या मेंदूचे लक्ष टीव्हीकडे असते, जेवणाकडे नसते. यामुळे पचनसंस्था बिघडते. रात्री सुद्धा तुम्हाला ही सवय असेल तर तुमच्या झोपेवरही परिणाम होऊ शकतो.
* या सवयीमुळे जेवणाचा आनंद घेता येत नाही. यामुळे खाद्यपदार्थाचा स्वादही समजत नाही.