आरोग्यनामा ऑनलाईन – सतत गोड खाण्याची इच्छा होत असेल, तसेच तोंडात बर्फाचा तुकडा ठेवावा असे वाटत, आइस्क्रीम, कुल्फी किंवा बर्फ खाण्याची इच्छा होत असेल असेल किंवा अंथरूणावर पडल्यानंतर अस्वस्थ वाटल्यास दुर्लक्ष न करता डॉक्टरांकडून तपासणी करून घ्या. कारण ही लक्षणे शरीरात आयर्नची कमतरता असल्याची आहेत. ही समस्या २ ते ३ महिन्यांपासून असेल तर यास आयर्न डेफिशिएंसी एनिमीया म्हटले जाते. यासाठी किशमिश, चणे, मूगाचे सेवन करावे हिवाळ्यात त्वचा शुष्क होते. परंतुख उन्हाळ्यातही त्वचा शुष्कम होत असेल तर शरीरात खास व्हिटॅमिनची कमतरता असू शकते. काही लोक अशी समस्या जाणवल्यास ब्यूटी क्रीम आणि ऑइल लावतात.
परंतु, शुष्क त्वचा ही समस्या व्हिटॅमिन ई ची कमतरता असल्यास जाणवते. यासाठी आहारात पालक आणि बदाम समावेश करावा. शरीरात ग्लूकोज कमी असल्यास सतत गोड खाण्याची इच्छा होते. गोड खाण्याची इच्छा होत असेल तर मधाचे सेवन करावे. मधात मोठ्याप्रमाणात ग्लूकोज असते. विविध फळे खाल्ल्यास त्यांचा चांगला परिणाम होतो. इकडून तिकडे आणि तिकडून इकडे फिरत असाल तर पोटॅशिअमची कमतरता असू शकते. त्यासोबतच मांसपेशींमध्ये तणाव हा सुद्धा पोटॅशिअमच्या कमतरतेचा संकेत आहे. ही कमतरता दूर करण्यासाठी डाएटमध्ये केळी, नारळाचं पाणी आणि बीटाचा समावेश करावा. कलिंगड आणि खरबूजही खावे.