डेंटिस्टना फॅमिली फिजिशियन प्रॅक्टिसची परवानगी देण्याचा केंद्राचा निर्णय वादात
आरोग्यनामा ऑनलाईन – केंद्र सरकाराने आयुष डॉक्टरांना अॅलोपॅथीची प्रॅक्टिस करण्यासाठी ब्रीज कोर्स आणला होता. परंतु, केंद्राचा हा निर्णय वादात सापडल्यानंतर डेंटिस्टना फॅमिली फिजिशिअनची प्रॅक्टिस करण्यासाठी सरकार ब्रीजकोर्स आणण्याच्या विचारात केंद्र सरकार आहे. याबाबत नीती आयोगाची नुकतीच एक बैठक झाली असून या बैठकीत डेंटिस्टना फॅमिली फिजिशियनची प्रॅक्टिस करण्याची परवानगी देण्याबाबत चर्चा करण्यात आली. यावर आता पुन्हा बैठक होणार असून याबाबत नीती आयोगाने एक नोटीस जारी केली आहे. दरम्यान, केंद्राचा हा निर्णय वादात सापडला आहे. रूग्णांच्या जीवाशी हा खेळ असल्याचे म्हटले जात आहे.
नीती आयोगाच्या या नोटिसीत म्हटले आहे की, देशभरात डॉक्टरांचा तुटवडा यासाठी डेंटिस्टना फॅमिली फिजिशियनची प्रॅक्टिस करण्याची परवानगी देण्याचा विचार आहे. यासाठी डेस्टिंटकरिता ब्रीजकोर्स सुरू करण्यात येणार आहे. वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञ हा निर्णय स्वीकारतील का? जर काही मेडिको लीगल प्रकरण आले तर फिजिशियन म्हणून प्रॅक्टिस करणाऱ्या डेंटिस्टविरोधात कायदेशीर प्रक्रिया कशी असेल? असे अनेक प्रश्न सरकारच्या या निर्णयावर विचारले जात आहेत. केंद्र सरकारनं याआधीदेखील आयुष डॉक्टरांना अॅलोपॅथीची प्रॅक्टिस करण्यासाठी ब्रीज कोर्स आणला होता. त्यावेळी अॅलोपॅथी डॉक्टरांनी विरोध केला होतो. नॅशनल मेडिकल कमिशन बिलमध्ये हा ब्रीजकोर्स नको म्हणून देशभरातील डॉक्टरांनी आंदोलन केले होते. त्यानंतर हा ब्रीजकोर्स केंद्र सरकारने रद्द केला होता. आता सरकारने पुन्हा घेतलेला डेन्टीसबाबतचा निर्णय वादात सापडण्याची शक्यता आहे.
सरकारच्या या निर्णयावर तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, अशा पद्धतीच्या ब्रीजकोर्सचा काही फायदा होणार नाही. कारण एमबीबीएस आणि बीडीएस या देन्ही वेगवेगळ्या फॅकल्टी आहेत. शिवाय त्यांचे स्पेशलायजेशनही वेगळे आहे. त्यामुळे या डॉक्टरांना जनरल मेडिसीनचे संपूर्ण ज्ञान नसते. आणि याचा अधिक फटका हा रूग्णांना बसू शकतो. या ब्रीजकोर्सचा विचार ग्रामीण भागातील गरीब आणि गरजूंसाठी करण्यात आला. याचा अर्थ शहरातील लोकांना उच्चशिक्षण घेतलेल्या डॉक्टरांकडून सुविधा मिळणार आणि ग्रामीण भागातील रूग्णांना ब्रिजकोर्सद्वारे शिक्षण घेतलेल्या डॉक्टरांकडून उपचार मिळणार. हा एका पद्धतीने भेदभाव आहे. ग्रामीण भागात डॉक्टरांची कमतरता असल्याने हा ब्रीजकोर्स सुरु कऱण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. डेंटिस्ट डॉक्टरांना केवळ दातांच्या उपचारांची माहिती असते. संपूर्ण शरीर आणि इतर अवयवांच्या उपचारांची त्यांना अधिक माहिती नसते. त्यामुळे या डॉक्टरांना संपूर्ण ज्ञान नसल्याने रूग्णांचे जीव धोक्यात येऊ शकतो.