पोटाची चरबी कमी न होण्याची ‘ही’ ९ मोठी कारणे, त्यासाठी ‘हे’ करा

Belly fat

आरोग्यनाम ऑनलाइन टीम – अनेकदा लोक आपल्या पोटाच्या अति चरबीसाठी तस्त्र असतात. ती कमी करण्यासाठी लोक अनेक उपाय करत असतात. तरीदेखील त्यांना काही फरक दिसत नाही. व्यायाम करुन देखील पोटाची चरबी कमी होत नाही. आपल्या पोटाच्या चरबीपासून सुटका मिळण्यासाठी आपले आपल्या खाण्यावर नियंत्रण असणे सगळ्यात महत्वाचे आहे. यामुळे पोटाची चरबी वाढणे पोटावर अतिरिक्त चरबी येणे अशा समस्या जाणवू लागतात. जर तुमचे पोट मोठे दिसत असेल याकडे तुम्ही दुर्लक्ष करु नका. कारण पोटामुळे अनेक रोग होऊ शकतात.

अनेकदा आपण पोटाकडे लक्ष देत नाही आणि नंतर मग आपण पोट कमी करण्यासाठी व्यायाम करणे, उपाशी राहणे, डाएट करणे हे करण्यास सुरुवात करतो. पण हे करण्याआधी आपण जर पोट वाढू नये यासाठी काळजी घेतली तर या समस्येचा तुम्हाला सामना करावा लागणार नाही. तु्म्हाला माहित आहे का ? की, पोटाची चरबी  कशामुळे वाढते आणि कमी करण्यासाठी काय करायचे.  याची माहिती आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

१. पोटाची चरबी  अनेकदा झोप न झाल्यामुळे वाढते.

२. पोट कमी न होण्याचे कारण आपण अन्य खाद्य पदार्थाचे अधिक सेवन करतो.

3.  पोट कमी न होण्याचे कारण म्हणजे तणाव.

४. पोटावरील चरबी कमी करण्यासाठी तुम्ही खोबरे तेल वापरु शकता. त्या तेलामध्ये तुम्ही विक्स घालून याचे मिश्रण करुन तुम्ही पोटाची मालिश करा.

५. जेव्हा आपण योग्य प्रकारे व्यायाम किंवा खाण्यावर नियंत्रण ठेवले नाही तर पोटाची चरबी  वाढतच जाईल.

६. रोज उठल्यावर लिंबू आणि मधाचे मिश्रण पाण्यात टाकून प्या. काही दिवसातच तुम्हाला फरक जाणवेल.

७. रोज जेवणामध्ये लिंबूचा वापर केला तर पोटाची चरबी कमी होते.

८.  पोटाची चरबी  कमी करण्यासाठी आहारामध्ये सोडा टाकणे बंद करा.

९. पोट कमी न होण्याचे कारण म्हणजे आपल्या  जेवणामध्ये मॅग्नेशिअमची कमी.