रोगाच्या जीवाणूंचा शोध काही मिनिटांत घेता येणार
आरोग्यनामा ऑनलाईन –एक नवे उपकरणशास्त्रज्ञांनी विकसित केले असून या उपकरणाच्या मदतीने जीवाणूंचा अवघ्या काही क्षणांमध्ये शोध घेता येणार आहे. पूर्वी या कामासाठी अनेक दिवस लागत होते. अमेरिकेतील पेन स्टेट युनिव्हर्सिटीतील एका चमूने हे उपकरण तयार केले आहे.
जैवचिकित्सीय अभियांत्रिकी व यांत्रिकी अभियांत्रिकीचे प्राध्यापक पक किन वूंग यांनी सयुंक्तपणे या नव्या पद्धतीचा शोध लावला आहे. हे उपकरण सूक्ष्म तंत्रज्ञानाच्या वापरावर आधारित असून त्याच्या मदतीने जीवाणूच्या पेशी पकडण्यासाठी जाळे पसरले जाते. त्यामुळे ते इलेक्टड्ढॉन सूक्ष्मदर्शकाच्या मदतीने पाहिले जाऊ शकतात.
या पद्धतीमुळे शरीरात जीवाणूंचे अस्तित्व आहे का आणि त्यांच्यासाठी कोणतीही औषधे योग्य ठरू शकतील, याची अवघ्या ३० मिनिटांमध्येच ही चाचणी केली जाऊ शकते. दुसरीकडे पूर्वी अशा प्रकारच्या चाचणीसाठी चार ते पाच दिवसांचा कालावधी लागत होता. वूंग यांनी सांगितले की, सध्या डॉक्टरांकडून ज्या जीवाणूरोधक औषधांची शिफारस केली जाते, ती कधीकधी रुग्णाच्या शरीरात नसतातही. हे नवे उपकरण जीवाणूंच्या अस्तित्वाची माहिती देतेच, शिवाय ते कोणत्या प्रकारचे आहेत, हेदेखील सांगते.