आरोग्यनामा ऑनलाइन टीम – शरीरावर विविध ठिकाणी असे पॉइंट्स असतात ज्यांच्यावर दाब दिल्यास अनेक आजार बरे होऊ शकतात. या उपचार पद्धतीला अॅक्युप्रेशन थेरपी असे म्हटले जाते. ही खुप जुनी उपचार पद्धती असून चिनमध्ये तिचा जास्त वापर केला जातो. या उपचार पद्धतीमध्ये औषधोपचार न करता केवळ शरीराचे ठराविक पॉइंट्स दाब देऊन उपचार केले जातात. माणसाच्या शरीरावर असे दहा पॉइंट आहेत, ज्यांच्यावर दाब दिल्यास अनेक व्याधी दूर होतात. हे दहा पॉइंट कोणते याविषयी जाणून घेवूयात.
हे आहेत ते दहा पॉइंट्स
१. बिगर रशिंग
अंगठा आणि मोठे बोट यांच्या मधोमध हा पॉइंट असतो. येथे दाबल्याने डोळ्यांचा थकवा, हॅँगओव्हर, डोकेदुखी दूर होऊ शकते. तसेच प्रतिकारशक्ति सुद्धा वाढते.
२. कमांडिंग मिडल
गुडघ्याच्या मागे पोटरीवर हा पॉइंट असतो. येथे दाब दिल्यास पाठदुखी, कमरेतील दुखणे, गुडघ्यांचा ऑर्थरायटिस, सायटिकात आराम मिळतो.
३. शेन मेन
कानाच्या वरच्या बाजूला हा पॉइंट असतो. स्मोकिंगची सवय, तणाव, एंग्जायटी, डिप्रेशन, झोपण्याची समस्या दूर करण्यासाठी येथे दाब देऊन उपचार केला जातो.
४. हेवनली पिलर
डोके आणि मानेच्या मध्यभागी हा पॉइंट असतो. तणाव, एंग्जायटी, थकवा, डोकेदुखी, मानदुखी आणि झोपेची समस्या असल्यास येथे दाब दिला जातो.
५. सॅकरल पॉइंट्स
पाठीचा कणा संपतो तेथील टेल बोनजवळ हे भरपूर पॉइंट्स असतात. सायटिका, लोवर बॅकपेन शिवाय मासिक पाळीतील समस्या दूर करण्यासाठी येथे दाब दिला जातो.
६. जॉईनिंग द वॅली
अंगठा आणि इंडेक्स बोटाच्या मध्यभागी असलेल्या कातडीच्या जागी हा पॉइंट असतो. डोकेदुखी, मानेचे दुखणे, दातदुखी, खांदादुखी, ऑर्थराइटिस, हॅँगओव्हर, आदीमध्ये येथे दाब दिला जातो.
७. पॅरिकार्डियम
हाताच्या पंजाच्या थोडा खाली मनगटावर हा पॉइंट असतो. येथे दाबल्यास अस्वस्थता, मोशन सिकनेस, वॉमेटिंग, पोटाची गडबड, डोकेदुखी, छाती दुखणे, हाताचे दुखणे बरे होते.
८. थर्ड आय
डोळ्यांच्या वर दोन्ही आयब्रोच्या मध्यभागी हा पॉइंट असतो. मानसिक शांती, मेमरी पॉवर, ताणतणाव, थकवा, डोकदुखी, डोळ्यांमध्ये दुखणे आणि झोपेची समस्या असल्यास येथे दाब दिला जातो.
९. सी ऑफ ट्रेक्वालिटी
छातीच्या मध्यभागी हा पॉइंट असतो. एंग्जायटी, नर्वसनेस, डिप्रेशन, हिस्टीरिया, इमोशनल प्रॉब्लेम्स असल्यास येथे दाब दिला जातो.
१०. लेग थ्री माइल्स
गुडघ्यांच्याखाली चार बोटाच्या अंतरावर हा पॉइंट असतो. अपचन, अॅसिडिटी, मलावरोध, पोट फुलणे, उलटी आदी समस्यांमध्ये येथे दाब दिला जातो.