आरोग्यानामा ऑनलाइन टीम – गुलाबाच्या पाकळ्यांमुळे वजन कमी होऊ शकते, यावर सहसा कुणाचा विश्वास बसणार नाही. परंतु, हे खरे आहे. गुलाबाच्या पाकळ्यांचा वापर करून आपण पंधरा दिवसात दहा किलो वजन कमी करू शकतो, असा दावा, काही तज्ज्ञ करतात. गुलाबाचे फुल आणि पाकळ्या यामध्ये आरोग्यासाठी लाभदायक असे अनेक घटक असतात. गुलाबाच्या पाकळ्यांमध्ये अँटीसेप्टीक आणि बुरशीला रोखणारे गुण असतात. यामुळे पुरळ आणि डाग दूर झाल्याने चेहरा सुंदर दिसतो. गुलाबाच्या पाकळ्यांचा वापर करून वजन कमी कसे करावे, याबाबत आपण जाणून घेणार आहोत.
पाकळ्यांचे ड्रिंक
गुलाबाच्या पाकळ्यांनी घरच्या घरीच एक हेल्दी ड्रिंक बनवता येते. वजन कमी करण्यासाठी हे ड्रिंक अतिशय फायदेशीर आहे. मार्केटमधील ड्रिंक्सचे अनेक साईड इफेक्ट होऊ शकतात. तसेच हे खार्चिकही असते. मात्र हे ड्रिंक बनवण्यासाठी काहीच खर्च येत नाही. घरच्या घरीच नैसर्गिक पद्धतीने तयार केलेल्या या ड्रिंकमुळे फॅट बर्न होऊन वजन कमी होते.
असे तयार करा
१ ताज्या गुलाबाच्या १० ते १५ पाकळ्या एक ग्लास पाण्यामध्ये उकळून घ्या.
२ पाणी गुलाबी रंगाचे होईपर्यंत उकळत रहा.
३ या पाण्यात चिमुटभर दालचिनी पावडर आणि चवीसाठी थोडेसे मध टाका. दालचीनी पावडरला गुलाबाच्या पाकळ्यांसोबत पिल्याने फॅट बर्न होते व पचनक्रियाही सुधारते.
४ चांगले परिणाम होण्यासाठी हा हर्बल टी रोज प्यावा.
५ या ड्रिंकने १५ दिवसांत १० किलो वजन कमी होऊ शकते.