आरोग्यनामा ऑनलाइन टीम – प्रथमच प्रणयाचा आनंद घेताना उत्कंठा शिगेला पोहचलेली असते. हा पूर्ण आनंद घेण्यासाठी मानसिक, शारीरिक आणि बौद्धिकदृष्ट्या दोघांचीही तयारी महत्वाची ठरते. अति वेगाने हा आनंद मिळवण्याचा प्रयत्न केल्यास निराशा पदरी येऊ शकते. म्हणून प्रथमच प्रणय करणारांनी काही गोष्टींची काळजी घेतली पाहिजे.
अशी घ्या काळजी
वेदना
प्रथमच सेक्स करताना वेदना होऊ शकतात. परंतु, यामुळे घाबरण्याची गरज नाही.
रक्तस्त्राव
काही स्त्रीयांना रक्तस्त्राव होतो. परंतु, सर्वच स्त्रियांना हा अनुभव येत नाही. त्यामुळे रक्तस्त्रावाचा स्त्रीच्या पावित्र्याशी संबंध लावणे हा मुर्खपणा आहे. रक्तस्त्राव झाल्यास घाबरून जाऊ नये.
व्हर्जिनिटी
जोडीदारापैकी एक जण व्हर्जिन असण्याची शक्यता असते. अशावेळेस त्यास समजून घ्या. एकमेकांना समजून घेतल्यास अनेक गोष्टी सोप्या होतात.
सुरक्षितता
अशावेळी सुरक्षितता पाळणे गरजेचे आहे. यामुळे लैंगिक आजारांपासून रक्षण होते. तसेच अनावश्यक गर्भधारणाही होत नाही.