आरोग्यानामा ऑनलाईन टीम : थोड्या जरी वेदना झाल्या तरी ताबडतोब पेनकिलर घेण्याची अनेकांना सवय असते. यामुळे वेदना सहन करण्याची शरीराची क्षमताच कमी होऊन जाते. डोकेदुखीसारख्या किरकोळ त्रासात सुद्धा पेनकिलर घेतली जाते. पेनकिलर घेण्यापूवी काही काळजी घेतली पाहिजे. अशाप्रकारे पेनकिलर घेणे खूप धोकादायक असते.पेनकिलर घेण्यापूर्वी घ्या ही काळजी
* दारू आणि पेनकिरल एकत्र घेणे हे धोकादायक असते.
* तुम्ही घेतल असलेल्या गोळ्यांची माहिती डॉक्टरांकडून करून घ्या.
* दोन दिवसांपेक्षा जास्त दुखणे सुरू असेल तर ताबडतोब डॉक्टरांकडे जावे.
* रिकाम्यापोटी कोणतीही गोळी घेऊ नये.
* गोळी घेताना भरपूर पाणी प्यावे.
* पेनकिलरच्य गोळ्यांची सवय लावून घेऊ नका.