आरोग्यनामा ऑनलाइन टीम – चांगली झोप माणसाला तरतरीत आणि तत्पर ठेवते. सकारात्मक दृष्टिकोन वाढण्यासाठी चांगली झोप आवश्यक आहे. चांगली झोप झाली नाही तर त्याचा परिणाम आपल्या आरोग्यावर होतो. तसेच मेंदूचे कार्य बिघडते. पक्षाघात, हदयविकार यासारखे विकारही होवू शकतात. पचनाचे विकार, वायू विकार यामुळेच होतात. जीवनात जर चांगली उद्दिष्ट्ये ठेवायची असतील, ती उद्दिष्ट जर पूर्ण करायची असतील तर रात्री शांत गाढ झोप येणे खूप गरजेचे आहे. जर चांगली झोप हवी असेल तर काही पदार्थांचे सेवन आवर्जून केले पाहिजे.
हे लक्षात ठेवा
१. रात्री झोपण्यापूर्वी कपभर गरम दूध नियमित प्या.
२. केळामध्ये मॅग्नेशियम, पोटॅशिअम आणि चांगल्या प्रतीचे कार्बोहायडेदृटस असतात. जे शरीरात गेल्यावर चांगली झोप येते.
३. बदामामध्येही मॅग्नेशियम असते. हे झोप येण्यासाठी उपयुक्त आहे. यामुळे शरीरातील रक्ताची पातळी संतुलित राहते.
४. मेलाटोनीन हा घटक शांत झोप येण्याच्या प्रक्रियेत महत्त्वाची भूमिका बजावतो. हा घटक चेरी खाल्ल्यास मिळू शकतो.
५. जवसामध्ये मॅग्नेशियम, ओमेगा ३ आणि टायप्टोफन हे घटक असतात. हे सर्व घटक चांगली झोप येण्यासाठी मदत करतात.