आरोग्यनामा ऑनलाइन टीम – पाय दूखणे, पायांना सूज येणे, ही लक्षणे आरोग्याच्या दृष्टीने चांगली नसून अशी लक्षणे आढळ्ल्यास ताबडतोब डॉक्टरांकडे गेले पाहिजे. अनेकदा असा त्रास झाल्यास त्याकडे दुर्लक्ष केले जाते. मात्र, दुर्लक्ष झाल्यास हा त्रास आणखी वाढू शकतो. कधी-कधी पाय अचानक थंड पडतात. अशावेळीही दुर्लक्ष करू नये. पायातील रक्तवाहिन्यांमधून व्यवस्थित रक्ताभिसरण न झाल्याने अशा प्रकारच्या समस्या होऊ शकतात. या समस्यांमागे अन्य कारणे सुद्धा असू शकतात.
महिलांच्या पायावर गरोदरपणात सूज येऊ शकते. लांबचा प्रवास केल्यानंतर अथवा पाय लोंबकळत ठेवून बसल्याने सूज येऊ शकते. तसेच जास्त वेळ उभे राहिल्यानेही पाय सूजतात. पायांची ही सूज जास्त काळ राहिल्यास ताबडतोब डॉक्टरांकडे जाऊन तपासणी करून घेणे गरजेचे आहे. रक्तप्रवाह सुरळीत होत नसल्यास पाय थंड पडतात. हे उच्च रक्तदाब, धूम्रपान किंवा हृदयारोगाचे लक्षण असू शकते.
उच्च मधुमेह असल्यास नसांना दुखापत झाल्यामुळेही असे होऊ शकते. पाय दुखत असल्यास कधीही दुर्लक्ष करू नये. हा त्रास रक्ताचा प्रवाह सुरळीत नसल्यास होऊ शकतो. पायांमध्ये ऑक्सिजनचा योग्य पुरवठा होत नसेल तरीसुद्धा पाय दुखू शकतात. तसेच काही वेळा मॅग्नेिशयमच्या कमतरतेमुळेही पाय दुखतात.