आरोग्यनामा ऑनलाइन टीम – कान हा अतिशय नाजूक आणि महत्वाचा अवयव आहे. यामुळे त्याची योग्य ती काळजी घेणे, निगा राखणे आवश्यक असते. परंतु, हे करताना काही चुका झाल्यास कानाला दुखापत होऊ शकते. घातक पद्धतीने कान साफ केल्याने गंभीर समस्या निर्माण होऊ शकते. यासाठी योग्य मार्ग कोणता याविषयी माहिती घेवूयात.
ही पद्धत वापरा
१) अंघोळ करताना कोमट पाण्याने कानाच्या वरील भाग साफ करा. यामुळे मळ मऊ होऊन वर येतो. नंतर सहजपणे मळ काढता येतो.
२) इयर कॅडलिंग ही खुप जुनी पद्धत आहे. यामध्ये पोकळ मोणबत्तीने कानातील मळ काढला जातो. मेणबत्तीचे एक टोक कानामध्ये तर दुसरे टोक पेटविले जाते. गरमीमुळे कानातील मळ वितळून बाहेर पडतो. परंतु, यामध्ये जोखीम असल्याने तज्ज्ञाकडून हे करून घ्यावे.