आरोग्यनामा ऑनलाईन टीम – मासिक पाळीदरम्यान हार्मोन्सच्या चढ-उतारामुळे महिलांच्या चेहऱ्यावर पिंपल, पोट दुखणे, तणाव, डोके दुखी आदी समस्या त्यांना जाणवू लागतात. पाळीमध्ये शरीराच्या प्रत्येक भागावर परिणाम होतो त्यामध्ये त्वचा ही येते. महिलांना अशावेळी त्वचेवर पिंपल्स, डाग अशा समस्येचा सामना करावा लागतो. जर तुम्हाला पाळीदरम्यान त्वचा सुंदर आणि हेल्दी ठेवायची असेल तर तुम्हाला याची विषेश काळजी घेणे गरजेचे आहे. काही साधारण गोष्टींचे उपाय करुन तुम्ही तुमच्या त्वचेची काळजी घेऊ शकता.
मासिक पाळी महिलांच्या जीवनातील एक हिस्सा आहे. १३ वर्ष पार केल्यांनंतर ४५ ते ५० वर्षापर्यंत महिलांना पाळी येते. त्यामुळे एवढ्या वर्षे तुम्ही तुमच्या शरीराच्या काळजीबरोबरच त्वचेची काळजी घेणे आवश्यक आहे. जाणून घेऊया याबद्दल काही महत्वाच्या टिप्स
मासिक पाळीदरम्यान आपल्या त्वचेची काळजी घेण्यासाठी करा फेशिअल
पाळीमध्ये त्वचेची छिद्रे मोठी होतात. त्यामुळे चेहऱ्याची त्वचा खराब होते. यासाठी चेहरा साफ करण्यासाठी तुम्ही फेशिअल करु शकता. पाळी येण्याआधी १० ते १२ दिवस आधी फेशिअल करणे योग्य आहे. यामुळे आपली चेहऱ्याची त्वचा सुंदर दिसते.
पाळीमध्ये त्वचा निरोगी ठेवण्यासाठी मेकअप टाळा
पाळीमध्ये तुम्ही मेकअप केला नाही तर त्वचा चांगली राहते. त्याएवजी चेहऱ्याला क्रिम, हळद, फळांचे सालीचे मास्क करुन लावले तर त्वचा खुलून दिसते.
पाळीदरम्यान स्किन केअरसाठी डाएटवर लक्ष द्या
पाळीमध्ये त्वचा सुंदर ठेवण्यासाठी ओमेगा-३ फॅटी अॅसिड, विटॅमिन ई युक्त खाद्य पदार्थांचे सेवन केल्याने फायदेशीर असते. त्यामुळे त्वचेवर आलेली सूज कमी होते. त्वचा मॉइश्चराइज राहते. त्यामुळे पाळीमध्ये महिलांनी खाण्या-पिण्याकडे लक्ष देणे गरजेचे आहे.
पाळीदरम्यान एक्सरसाइज करणे गरजेचे
पाळीमध्ये एक्सरसाइज केल्याने रक्त संचार व्यवस्थित राहते. यासोबतच घामामध्ये आपल्या शरीरातून टॉक्सिन्स बाहेर पडते. त्यामुळे तुमची त्वचा टवटवीत दिसू लागते.