आरोग्यनामा ऑनलाइन टीम – तरुण वयात जर स्वत:च्या शरीराकडे लक्ष दिले नाही, तर त्याचा त्रास मध्यमवयात होतो. तसेच त्याचे दुष्परिणाम म्हातारपणात भोगावे लागतात, असे शास्त्रज्ञांना एका संशोधनात आढळून आले आहे. म्हणून तरूण वयातच आरोग्याकडे लक्ष दिले पाहिजे. तरूण वय एकदा हातातून निसटले की नंतर आरोग्याची घेतलेली काळजी तुम्हाला म्हणावी तितकी साथ देणार नाही. तरूण वयात आरोग्याकडे दुर्लक्ष केल्याने मध्यमवयात तसेच म्हातारवणी डायबेटिस, ब्लड प्रेशर यासारखे विकार स्मृतिभंशाकडे घेऊन जाऊ शकतात.
काय म्हणतात शास्त्रज्ञ…
१) मध्यमवयात जर तुम्हाला डायबेटिस, ब्लड प्रेशर यासारखे विकार असतील आणि पुन्हा तुम्ही धुम्रपानही करीत असाल, तर आयुष्याच्या उत्तरार्धात तुम्हाला डिमेन्शियाचा आणि स्मृतिभंशाचा त्रास मोठ्या प्रमाणावर होऊ शकतो.
२) डिमेन्शिया, हायपर टेन्शन, ब्लड प्रेशर यांचा एकमेकांशी संबंध आहे.
३) तरूण वयात तब्येतीकडे लक्ष देत नसाल, तर ताबडतोब तुमची जीवनशैली बदला, भविष्यातील विकारांपासून स्वत:ला वाचवा आणि निरोगी, आनंदी आयुष्याची हमी आजच घ्या.
(टिप : वरील सर्व समस्या आम्ही फक्त माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. प्रत्येक व्यक्तीची शारीरिक क्षमता वेगवेगळी असते. त्यामुळे उपाय करण्यापुर्वी तज्ज्ञांचा सल्ला घेणे फायदेशीर ठरते.)