आरोग्यनामा ऑनलाइन टीम – लहान बाळ घरात असले की डायपर खरेदी ही पालकांकडून केली जातेच. रात्री झोपताना बाळाला डायपर लावले की, ते शांत झोपते, यामुळे अनेकजण बाळाला डायपर लावतात. तसेच दिवसाही ते वापरले जाते. खरं तर बाळापेक्षा स्वत:च्या सोयीसाठी पालक नॅपी पॅड जास्त वापरतात, हे सत्य आहे. परंतु, चुकीच्या पद्धतीने हे वापरले गेल्यास बाळाचे आरोग्य धोक्यात येऊ शकते, असे संशोधनातून निष्पन्न झाले.
हे आहेत धोके
१. खूप वेळ डायपर लाऊन ठेवल्याने बाळाला युरिनल संसर्ग होऊ शकतो.
२. संक्रमणामुळे बाळाची चिडचिड होते. ते आक्रमक होण्याचाही धोका असतो.
३. संवेदनशील त्वचेवर पॅड सारखे घासले गेल्याने त्वचा लाल होते. खाजही येते.
४. नॅपी पॅडसाठी अनेक रसायनांचा वापर केला जातो.
५. यातील प्लॅस्टीकने हवा खेळती राहत नाही. यामुळे संक्रमण होऊ शकते.
ही काळजी घ्या
१. डायपर लावले की त्याला वारंवार तपासा.
२. तीन ते चार तासांच्यावर डायपर वापरू नका.
३. नॅपी चेंज केल्यानंतर बाळाच्या त्वचेला चांगल्या पद्धतीने साफ करा.
४. त्वचा पूर्णपणे वाळल्यावरच बाळाला दुसरे कपडे घाला.