आरोग्यनामा ऑनलाइन टीम – काही महिलांना मासिक पाळीत थोडाफार त्रास होतो. या दरम्यान त्यांच्या शारीरिक आणि मानसिक स्थितीमध्ये बदल घडून येतात. म्हणून महिलांना या काळात काही कामांपासून दूर रहावे लागते. त्यामुळे या दिवसांत होणारा दूर होऊ शकतो.
हे लक्षात ठेवा
१. मासिक पाळी दरम्यान योगासने, व्यायाम किंवा जॉगिंग टाळा. यामुळे रक्तस्त्राव जास्त होतो. पोटदुखी वाढते. जास्त धावपळ, दगदग टाळावी.
२. चिडचिड जास्त होते. त्यामुळे शांत राहण्याचा प्रयत्न करा. आवडल्या विषयांच्या पुस्तक वाचा. गाणी ऐका. चित्रपटही पाहू शकता.
३. काही महिलांना ब्लड प्रेशरचा त्रास होतो. या दिवसांत रक्तस्त्राव होऊन थकवा येत असल्याने त्यांचे ब्लड प्रेशर वाढू शकते. त्यामुळे या दिवसांत स्वतःला शांत ठेवण्याचा प्रयत्न करा.
४. या काळात त्वचा नाजूक होते. त्वचेला जळजळ होईल अशा गोष्टींचा वापर टाळा. थ्रेडींग किंवा फेशिअल करू नये.
५. मासिक पाळीदरम्यान स्वच्छता राखा. सेनिटरी नॅपकिन दर पाच तासांनी बदला. जास्तीत जास्त पाणी प्या.
६. फळे, ड्रायफ्रुट्स, मासे यासारख्या गोष्टींचे सेवन करा.
Visit : arogyanama.com