आरोग्यानामा ऑनलाइन टीम : डोळ्यांची साथ अतिशय वेगाने पसरते. क्लासमध्ये, ऑफिसात कुणा एकाचे डोळे आले की अनेकांना ही समस्या ताबडतोब होते. या समस्येचा संसर्ग वेगाने होत असन्याने हा त्रास होतो. डोळे येवू नयेत म्हणून काही गोष्टींची काळजी घेतली पाहिजे. ज्यांचे डोळे आले असतील त्यांच्यापासून लांब रहा. डोळे येणे हे बॅक्टेरिअल इन्फेक्शन आहे. फंगल, केमिकल इन्फेक्शनमुळे सुद्धा डोळे येतात.
अशी घ्या काळजी
१ डोळे आलेल्यांपासून लांब रहा.
२ लेन्सची योग्य काळजी घ्या.
३ चष्माही वारंवार स्वच्छ करा.
४ सारखे डोळे चोळू नका.
५ हॅण्ड सॅनिटायझरने हात स्वच्छ करा.
६ डोळ्यांना खराब हातांनी स्पर्श करू नका.
७ डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय डोळ्यात कुठलीही औषधे, डड्ढॉप्स टाकू नका.
८ दुसऱ्या काजळ, लिपस्टिक, डिओ, परफ्युम वापरू नका.
९ दुसऱ्याचा टॉवेल वापरू नये.
१० हात पुसायचे नॅपकिन स्वच्छ ठेवा.
११ ऑफिसवरून आल्यानंतर रुमाल स्वच्छ करा.
१२ बाहेरुन आल्यावर हातपाय स्वच्छ धुवा.
Visit : arogyanama.com