आरोग्यनामा ऑनलाइन टीम – Womens Care | शतावरी ही अतिशय गुणकारी वनस्पती असून तिचा विविध आजार दूर करण्यासाठी वापर केला जातो. महिलांशी (Womens Care) संबंधीत आजारात शतावरीचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो. अनेक महिलांना मासिक पाळी येण्यापूर्वी खूप त्रास होतो. पोट दुखणे, पाठ दुखणे किंवा डोकेदुखी असा त्रास होत असल्यास शतावरी घ्यावी. यामुळे या समस्या दूर होतात.
हे आहेत अन्य फायदे
– यात अँटी बॅक्टेरिया, अँटी कॅन्सर व अँटी अल्सर गुण असल्याने पचनशक्ती सुधारुन पोटाचे कार्य सुरळीत होते.
– ऑक्सिडंट, बॅक्टेरिया, बुरशी यामुळे होत असलेल्या रोगांपासून बचाव होतो.
– ताणतणाव कमी होतो. मन शांत रहाते.
– स्मरणशक्ती वाढते.
– महिलांना रजोनिवृत्तीच्या काळातील समस्यांवर लाभदायक आहे.
– पुरुषांच्या यौन समस्यांवर गुणकारी आहे.
– बाळंतीण स्त्रियांच्या दुधाचे प्रमाण व गुणवत्ता वाढते.
– थकवा तसेच कोरडेपणा दूर होतो.
– यातील फायको-इस्टजन हार्मोन प्रिकर्सरमुळे स्त्रियांमध्ये गर्भधारण क्षमता व ऊर्जा वाढते.
– स्त्रियांच्या प्रजनन संबंधित अवयवांसाठीही खूप उपयुक्त आहे.
Monsoon Diet Tips | पावसाळ्यात ‘या’ 6 वस्तू खाणे टाळा, गंभीर आजाराचे बनू शकतात कारण; जाणून घ्या
Monkeypox in US | कोरोनादरम्यान नवीन संकट ! अमेरिकेच्या टेक्सासमध्ये आढळली दुर्मिळ ‘मंकीपोक्स’ची केस