रोज रात्री २ इलायची १ ग्लास कोमट पाण्यासोबत घ्या, त्यानंतर कमाल पहा

May 11, 2019

आरोग्यनामा ऑनलाइन टीम – खरंतर मसाल्याचा पदार्थ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ईलायचीचे माऊथ फ्रेशनर आणि मसाल्यासाठीचा वापर केला जातो मात्र इवलीशी इलायची जर रोज रात्री तुम्ही कोमट पाण्यासोबत घेतली तर तुम्हाला दुप्पट फायदे मिळतात.

इलायची सेवन केल्यास होणारे फायदे
इलायची कफ, खोकला, अस्थमा, मुळव्याध आणि लघवी मध्ये होणारी जळजळ यामध्ये फायदेशीर असते. हृदय आणि गळ्याला आराम देते. हृदय बलवान करते. उलटी आणि जीव घाबरणे थांबवते. तोंडाची दुर्गंधी दूर करून सुगंध देते. स्टोन तोडते, कावीळ, अपचन, मूत्रविकार, छातीमध्ये जळजळ, पोट दुखी, उचकी लागणे आणि सांधेदुखी यामध्ये इलायची सेवन केल्याने फायदा मिळतो. जर आपण रात्री झोपण्याच्या अगोदर एक इलायची खाऊन गरम पाणी प्यायले तर आपल्याला अनेक फायदे मिळतात.

१) वजन कंट्रोल करते
जर तुमचे पोट बाहेर निघाले असेल तर आणि तुम्हाला परत ते आतमध्ये घ्यायचे असेल तर रात्री २ इलायची खाऊन गरम पाणी प्यावे. यामध्ये पोटेशियम, मैग्नीशियम, बिटामिन B1, B6 आणि बिटामिन C बॉडी मधील अतिरिक्त चर्बी वितळवतो. आणि यामध्ये असलेले फाइबर आणि कैल्शियम वजन कंट्रोल करते. यासाठी इलायची खाऊन गरम पाणी प्यावे.

२) केस गळणे बंद होते
रात्री २ इलायची खाऊन पाणी पिण्यामुळे केस गळणे बंद होते आणि केस काळे देखील होतात. यामुळे केसातील डेंड्रफ दूर होतो.
ब्लड सर्क्युलेशन योग्य होते. जर तुम्ही २ इलायची खाऊन १ ग्लास गरम पाणी प्यायले तर ब्लड सर्कुलेषण योग्य होते आणि तुमचे ब्लड प्युरीफाइ होते. ज्यामुळे तुमची स्कीन चांगली होते.

३) पचनशक्ती वाढते
जर तुम्ही इलायची खाऊन गरम पाणी प्यायले तर तुमचे डाइजेशन स्ट्राँग होईल. यामुळे आतडे आणि किडनीची सफाई होते. यामुळे बद्धकोष्ठ दूर होते.