आरोग्यनामा ऑनलाईन टीम – युरिनरी ट्रॅक्ट इंफेक्शन हा आजार बॅक्टेरिया, फंगस तसेच रेअर व्हायरस यांच्यामुळे होतो. शरीराच्या कोणत्याही भागात हे इंफेक्शन होऊ शकते. यामुळे किडनी आणि युटरसवर वाईट परिणाम होतो. शरीराच्या वरच्या व खालच्या अशा दोन्ही भागात हे इंफेक्शन होऊ शकते. याचे संकेत कसे ओळखावेत याविषयी माहिती घेवूयात.
खालच्या भागातील इंफेक्शन
* युरिनचा रंग बदलणे.
* पुरूषांना या समस्येमुळे रेक्टल पेन होते.
* महिलांना पेल्विक पेन होते.
* यूरिन करताना जळजळ होणे.
* वारंवार युरिन येणे. युरिनला रोखू न शकणे.
* युरिनमध्ये ब्लड येणे.
वरच्या भागातील इंफेक्शन
* यामध्ये अपर बॅक आणि बाजूला वेदना होतात आणि कमजोरी जाणवते.
* थंडी लागण्यासोबत तापही येणे.
* उल्टी येणे, अस्वस्थ वाटणे.
हे उपाय करा
१) प्रायव्हेट पार्टच्या हायजिनसाठी असणारे प्रॉडक्ट वापरण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्या.
२) महिलांनी पिरियड्सदरम्यान स्वच्छता राखावी.
३) दिवसात कमीतकमी सात ते आठ ग्लास पाणी प्या. यामुळे शरीरातील विषारी घटक बाहेर पडतील.
४) पब्लिक टॉयलेटचा वापर करण्यापूर्वी आणि नंतर फ्लश करा. खुप अस्वच्छता असल्यास तेथे जाणे टाळा.
५) युरिन जास्त वेळ दाबून ठेवू नका.