आरोग्यनामा ऑनलाइन टीम – Symptoms Of Overhydration | आपल्या शरीराला योग्यरित्या कार्य करण्यासाठी पुरेसे पाणी आवश्यक असते, परंतु जास्त पाणी सेवन केल्याने देखील अनेक आरोग्य (Health) समस्या उद्भवू शकतात. बहुतेक लोक डिहायड्रेशनच्या (Dehydration) लक्षणांकडे लक्ष देतात, तरीही ओव्हरहायड्रेशन (Overhydration) तितकेच धोकादायक असू शकते. जास्त पाणी पिण्यामुळे रक्तप्रवाहात सोडियम आणि इतर इलेक्ट्रोलाईट्सची पातळी असामान्यपणे कमी होते, जी दुर्मिळ प्रकरणांमध्ये घातक ठरू शकते. शरीरात सतत पाणी टाकल्याने तुमच्या रक्तातील सोडियमची पातळी कमी होऊ शकते, ज्यामुळे तुमच्या शरीरातील पेशींमध्ये सूज येऊ शकते. जास्त पाणी पित असल्याचे संकेत जाणून घेवूया (Symptoms Of Overhydration).
शरीरातील हे बदल देतात ओव्हरहायड्रेटचे संकेत (These Changes In The Body Indicate That You Are Overhydrated)
1) दिवसभर डोकेदुखी
डोकेदुखी (Headache) हे ओव्हरहायड्रेशन किंवा डिहायड्रेशनचे लक्षण असू शकते. जेव्हा तुम्ही जास्त पाणी पितात तेव्हा रक्तातील मिठाचे प्रमाण कमी होते, ज्यामुळे शरीराच्या सर्व भागांमध्ये पेशींना सूज येते.
2) लघवी करण्याची इच्छा कमी होते
जर तुम्ही सतत तुमचे यूरिनरी ब्लॅडर जास्त पाणी पिऊन भरून ठेवत असाल किंवा जास्तवेळ लघवी दाबून ठेवत असाल, तेव्ह हे जाणवणे अवघड आहे की तुम्हाला केव्हा लघवी (Urine) करण्याची गरज आहे. (Symptoms Of Overhydration)
3) तहान नसतानाही पाणी पिणे
शरीराला जास्त पाणी मिळत आहे की नाही हे जाणून घेण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे तहान नसतानाही जास्त पाणी पिणे.
4) लघवी पाण्यासारखी दिसते
जर तुम्ही योग्य प्रमाणात पाणी पीत असाल तर तुमच्या लघवीचा रंग फिकट पिवळा ते पारदर्शक पिवळ्या रंगापर्यंत असावा. परदर्शक लघवी हे हायड्रेशनचे सर्वात आरोग्यदायी लक्षण आहे असा एक समज आहे. रंगहीन लघवी असणे हे तुम्ही जास्त पाणी पीत असल्याचे स्पष्ट लक्षण आहे.
5) रात्री वारंवार लघवी करणे
दिवसातून 10 पेक्षा जास्त वेळा लघवी होत असेल तर तुम्ही शरीराच्या गरजेपेक्षा जास्त पाणी पीत असाल. लघवी करण्यासाठी रात्री एकापेक्षा जास्त वेळा जाग येणे हे अतिहायड्रेशनचे लक्षण आहे.
6) उलटी किंवा अतिसार
ओव्हरहायड्रेशनची लक्षणे निर्जलीकरणासारखी दिसतात. जेव्हा तुम्ही जास्त पाणी पिता,
तेव्हा तुमचे मूत्रपिंड अशा बिंदूवर पोहोचते जेथे ते अतिरिक्त द्रवपदार्थापासून मुक्त होऊ शकत नाहीत.
त्यामुळे तुमच्या शरीरात पाणी साठते.
7) हात, ओठ आणि पाय सुजणे
हायपोनेट्रेमियाच्या अनेक प्रकरणांमध्ये, लोकांना त्यांच्या हात, ओठ आणि पायांवर सूज येते.
जेव्हा संपूर्ण शरीरातील पेशी फुगतात, तेव्हा त्याचा प्रभाव तुमच्या त्वचेवरही दिसू लागतो.
(Disclaimer : वरील लेखामध्ये सांगितलेले विधी, पध्दती आणि दाव्यांचं आम्ही कुठलंही समर्थन करत नाही.
त्यांना केवळ सल्ला म्हणून घ्यावं. अशा पध्दतीच्या कोणत्याही उपचार / औषध / आहारावर अंमल करण्यापुर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)
Web Title :- Symptoms Of Overhydration | symptoms of overhydration these 7 signs show that you are drinking too much water and spoiling your health
Blood Sugar | डायबिटीज रूग्णांसाठी लीची ठरू शकते लाभदायक, जाणून घ्या सेवन करण्याची योग्य पद्धत