वयाच्या पस्तिशीनंतर हाडे मजबूत राहण्यासाठी ‘हे’ उपाय करा
आरोग्यनामा ऑनलाईन टीम – वृद्धावस्थेत हाडे कमकुवत होतात. मात्र, अलिकडे हाडे ठिसूळ होण्याचा आजार पस्तिशीनंतर अनेकांना होत आहे. हाडे ठिसूळ होण्याच्या या आजाराचे नाव ऑस्टियोपोरोसिस आहे. यात हाडे ठिसूळ होऊन फ्रॅक्चर होण्याची शक्यता असते. सायलंट डिसीज म्हणून ओळखला जाणारा हा आजार वेळीच ओळखून उपचार केल्यास बरा होऊ शकतो. परंतु, ऑस्टिपोरोसिस झाल्याचे उशीरा समजले तर तो लवकर बरा होत नाही. हा आजार महिलांमध्ये जास्त दिसून येतो. जागतिक आरोग्य संघटनेच्या सर्वेक्षणानुसार जगभरामध्ये तीन अब्ज महिलांना या आजाराची लागण झाली आहे. ३५ वर्षानंतर हाडातील कॅल्शियमचे प्रमाण कमी होते आणि हा आजार सुरू होतो.
या आजाराची कारणे
ऑस्टियोपोरोसिस होण्याची अनेक कारणे आहेत. अनुवांशिक, प्रोटीन्स आणि कॅल्शियमची कमतरता, वाढते वय, धुम्रपान, मधुमेह, स्टेरॉइडसारखी औषधे, जीवनसत्वाची कमतरता, महिलांची मासिक पाळी अकाली बंद होणे, ही ऑस्टिपोरोसिस होण्यामागील कारणे आहेत. तसेच शरिरातील ड जिवनसत्वाचे प्रमाण कमी झाल्यानंतर ऑस्टयोपॅरॉसिस या आजाराची लागण होते. सुर्य प्रकाशापासून शरिराला ड जिवनसत्व मिळते. यासाठी रोज कमीतकमी २० मीनीट सुर्यप्रकाश घेणे आवश्यक आहे. घरात किंवा ऑफीसामध्ये जास्त काळ थांबल्यामुळे शरिराला ड जिवनसत्व मिळत नाही.
महिलांमध्ये जास्त प्रमाण
गरोदरपणात महिलांना कॅल्शियमची जास्त गरज भासते. परंतु, या काळात आवश्यक कॅल्शियम न मिळाल्याने हा रोग गरोदर महिलांना जास्त होतो. काही महिला माती व चुना खाऊन हे प्रमाण वाढवण्याचा प्रयत्न करतात. मात्र यामधून फक्त ३० टक्के कॅल्शियम मिळतो. पन्नासपेक्षा जास्त वयाच्या महिलांमध्ये या रोगाचे प्रमाण जास्त आहे. ७५ पेक्षा जास्त वयाच्या ९० टक्के महिलांमध्ये हा रोग आढळून येतो.
असे वाढवा कॉल्शियम
दूध, दही, पनीर, खीर, या पदार्थांचा आहारात समावेश केल्याने कॅल्शियमचे प्रमाण वाढते. मटर, बीट, पुदीना, कांदा यामध्ये कॅल्शियमची भरपुर असते. रोज एक ग्लास दूध पिल्याने शरिरात ३०० मिली ग्रॅम कॅल्शियम तयार होते. मासे खाऊन कॅल्शियमची कमी भरून काढत येते.
हे आहेत उपाय
या रोगावर नियंत्रण मिळवीण्यासाठी संत्री, पेरू, नाशपाति, अननस, केळी या फळांचा वापर आहारामध्ये जास्तीत जास्त वापर करावा. ऑस्टियोपोरोसिस या रोगावर परिणामकारक आयुर्वेदिक उपायसुद्धा आहेत. लोणी किंवा दुधातून २०० ते ५०० ग्रँम मोती भस्म पिल्यानंतर कॅल्शियमचे प्रमाण वाढते.