आरोग्यनामा ऑनलाईन टीम – मानवी शरीर हे खूप जटिल आहे. मानवी शरीरातील प्रत्येक अवयवाच्या वाढीसाठी आणि प्रत्येक अवयव निरोगी राहण्यासाठी शरीराला प्रोटिन्स , व्हिटामिन्स मिनरल्स यांची आवश्यकता असते. अंडे- डाळी अशा पदार्थांमधून प्रोटिन्स मिळते. संत्री – लिंबू अशा फळांमधून ‘सी’ व्हिटॅमिन तर सकाळच्या कोवळ्या उन्हातून ‘डी’ व्हिटॅमिन मिळते. शरीराला सर्वात जास्त गरज ही पाण्याची असते. पाण्यामुळे शरीरातील चयापचय हे सुरळीत चालू राहते. शरीरातील प्रोटिन्स आणि व्हिटामिन्स यांची गरज पूर्ण करण्यासाठी असे अनेक उपाय आपण करतही असतो परंतु शरीरात जर प्रोटीन कमी असतील तर काही समस्या निर्माण होतात. त्यांची लक्षणं काय आहेत हे आज आपण पाहणार आहोत.
एडिमा –
शरीराच्या कोणत्याही अवयवावर जर अचानक सुज आली असेल तर त्यास ‘एडिमा’ असे म्हटले जाते. ही समस्या शरीरात प्रोटीन कमी असल्याचा एक संकेत आहे. म्हणूनच या समस्येकडे जास्तकाळ दुर्लक्ष न करता त्वरित प्रोटीन लेवलची तपासणी करून घ्यावी.
अॅनिमिया –
ही शरीरातील अशी अवस्था आहे, ज्यामध्ये आपल्या शरीरातील रक्त हे लाल रक्तपेशी बनवण्यामध्ये अयशस्वी ठरतात. परिणामी लाल रक्त पेशींची संख्या कमी होत जाते. शरीरात जर लाल रक्त पेशी कमी झाल्या तर बीपी कमी होणे आणि थकवा जाणवणे अशा समस्या निर्माण होतात. यालाच अॅनिमिया असे म्हटले जाते.
केस गळणे –
केसांच्या सुदृढ वाढीसाठी प्रोटीनची मोठ्या प्रमाणावर आवश्यकता असते . जर तुम्हाला लांबसडक केस हवे असतील तर शरीरामध्ये प्रोटीनची आवश्यकता आहे.
जखम बरी होण्यास वेळ लागणे –
जर तुमची जखम बराच काळ ठीक होत नसेल तर तुमच्या शरीरामध्ये प्रोटीनची मात्रा कमी आहे हे समजावे.
अधिक भूक लागणे –
जेव्हा एखादी व्यक्ती वजन कमी करण्यासाठी प्रयत्न करत असते, तेव्हा त्यांना हाय प्रोटीन डायट दिला जातो. प्रोटीन शरीराच्या चयापचय प्रक्रियेला तृप्त ठेवतो. त्यामुळे जर भूक वाढत असेल तर शरीरामध्ये प्रोटीनची कमी आहे हे समजावे.
हाडे कमकुवत होणे
प्रोटीन शरीरात कमी झाले असेल तर शरीरातील हाडे कमकुवत होत जातात. हाडांच्या स्वास्थ्यासाठी प्रोटीन अत्यंत महत्त्वाचे आहे. जे लोक हाय प्रोटीन डाइट घेतात त्यांच्यामध्ये ७०% हाडे कमकुवत होण्याची शक्यता नसते.
थंडी वाजून येणे
ज्या लोकांना सामान्य वातावरणातही थंडी वाजते अशा लोकांमध्ये प्रोटीनची कमतरता असते.