मधुमेहाची ‘ही’ प्रमुख ७ ‘लक्षणं’, लक्षणे दिसताच डॉक्टरांकडे जा
त्वचेचा त्रास
त्वचेला होणारी खाज, दाग आणि दाह यासारख्या समस्यादेखील मधुमेहाकडे इशारा करतात. विशेषत: गळ्यावर सुरकुत्या पडल्या किंवा लाल डाग पडल्यास समजावे की, मधुमेहाचा धोका आहे.
अंधुक दृष्टी
कधी-कधी अचानक अंधुक दिसू लागल्यास ही समस्या मधुमेहाचा इशारा असू शकते. शरीरातील साखरेचे प्रमाण वाढल्याने डोळ्यांतील बाहुल्यांचा आकार बिघडतो. याचा दृष्टीवर परिणाम होतो. साखर नियंत्रित झाल्यानंतर पुन्हा सामान्यपणे दिसू लागते.
जास्त तहान लागणे
वारंवार तहान लागणे हे मधुमेहाचे लक्षण असू शकते. मधुमेह झाल्यावर व्यक्तीचे मूत्रपिंड जास्तीत जास्त ग्लुकोज तयार करते. अशाने शरीरात पाणी कमी होऊन तहान लागते. अशाप्रकारे वारंवार तहान लागत असल्यास त्याकडे दुर्लक्ष न करता ताबडतोब डॉक्टरांकडे जावे.
वजन कमी होणे
अचानक वजन कमी होणे हा सुद्धा मधुमेहाचा संकेत असू शकतो. तीन ते चार महिन्यांच्या काळात अडीच ते तीन किलो वजन कमी झाल्यास ताबडतोब डॉक्टरांकडे गेले पाहिजे. शरीर योग्य प्रमाणात ग्लुकोज पेशींपर्यंत पोहोचवू शकत नसल्याने वजन वेगाने कमी होते.
आळशीपणा
शरीरातील साखरेचे प्रमाण वाढल्याने अशक्तपणा येऊन दिवसभर आळस जाणवतो. तसेच शरीरातील साखरेचे प्रमाण कमी झाल्यावरही शरीराची ऊर्जा कमी होते. त्यामुळे थकवा जाणवतो.
भूक लागणे
वारंवार भूक लागत असल्यास हे लक्षण मधुमेहाचे लक्षण असू शकते. शरीरात रक्तातील शुगरचे प्रमाण घटू लागल्यास भुकेत वाढ होते. शरीरातील पेशींना पुरेशा प्रमाणात शुगर न मिळाल्याने ऊर्जा मिळत नाही. ही गरज पूर्ण करण्यासाठी शरीराला अतिरिक्त आहाराची गरज भासते.