आरोग्यनामा ऑनलाइन टीम – तरुण व्यक्तींमध्ये कोलोरेक्टल कँसरचा धोका वाढत असून तो ५० पेक्षा जास्त वय असलेल्यांना होतो असे यापूर्वी मानले जात होते. परंतु आता २० वर्षांच्या आसपासच्या लोकांनाही हा कँसर होत असल्याचे, द नॅशनल कँसर इंस्टीट्यूटच्या जर्नलमध्ये प्रसिध्द झालेल्या एका संशोधनात म्हटले आहे.
कोलोरेक्टल कँसर
कोलोरेक्टल कँसर मोठ्या आतडीचा कँसर तो मोठी आतडी किंवा रेक्टम मध्ये असतो. यामुळे इरिटेबल बाउल सिंड्रोम, बवासीर आणि बध्दकोष्ठता अशा पोटाच्या अनेक समस्या होतात.
ही आहेत लक्षणे
१ टॉयलेट करताना घट्ट लाल अथवा काळ्यारंगाचे रक्त पडणे
२ रेक्टममधून सतत रक्त येणे
३ टॉयलेटच्या वेळेत, जाण्याच्या वेळा, आकार यामध्ये बदल होणे
४ बद्धकोष्ठता, डायरिया सतत होणे
५ अचानक वजन कमी होणे
६ पोट आणि रेक्टममध्ये विनकारण वेदना होत राहणे
ही आहेत कारणे
१ डाएटमध्ये कमी फायबर घेणे. फॅटी, ऑयली आणि प्रोसेसड् फूड जास्त खाणे.
२ जास्त वेळ बसून राहणे. व्यायाम न करणे.
३ डायबिटीस आणि इन्सूलिन रेजिस्टेन्स
४ लठ्ठपणा
५ धुम्रपान आणि मद्यसेवन