आरोग्यनामा ऑनलाइन टीम – महिलांच्या अंडाशयात तयार झालेल्या फॉलिकल्समधून बीज बाहेर न पडता त्याच्या बाजूला आवरण तयार होते. त्याची सिस्ट तयार होते. शरीरामध्ये पुरुषी हार्मोन अँड्रोजेन जास्त प्रमाणात पाझरते. अँड्रोजेन्सचे इस्ट्रोजेन बनण्याची प्रक्रिया बंद होते. प्रोजेस्टेरॉनचे प्रमाणही कमी होते. या सगळ्या हार्मोन्सच्या उलथापालथीमुळे महिलांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. या एकत्रित परिणामांना पीसीओएस म्हणजेच polycystic ovary syndrome असे म्हणतात.
ही आहेत लक्षणे
१ स्त्रियांची मासिक पाळी अनियमित होते.
२ नको त्या ठिकाणी लव येते.
३ केस गळणे, केस पातळ होतात.
४ डोकेदुखी, थकवा जाणवतो
५ ओटीपोटात दुखते.
६ मूड स्विंग्सचा त्रास होतो.
७ चिडचिड, नैराश्य येते.
८ शरीरातील वेगवेगळ्या क्रिया-प्रक्रिया चुकीच्या मार्गांने जायला लागतात.
९ वजन वाढते.
१० डायबेटिस होऊ शकतो.
ही आहेत कारणे
* धकाधकीच्या वेगवान आयुष्यातले ताण-तणाव
* खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयी
* झोपेचे चुकीचे वेळापत्रक
* आहारात अति प्रमाणात कर्बोदकांचा समावेश.
हे आहेत उपचार
१ स्री रोग तज्ज्ञ किंवा एन्डोक्रिनोलॉजिस्टचा सल्ला घ्यावा.
२ सोनोग्राफी आणि रक्ताच्या चाचण्या करून त्याचे निदान होऊ शकेल.
३ शरीराची insulin sensitivity वाढवण्यावर भर दिला जातो.
४ जीवनशैलीमधील सकारात्मक बदल करावेत.