आरोग्यानामा ऑनलाईन टीम : अस्वच्छ व निकृष्ट अन्न खाणे, अति घाईघाईने खाणे आदी कारणामुळे फूड पॉयजनिंग होते. अस्वच्छता हे फूड पॉयजनिंगचे सर्वात मोठे कारण आहे. या समस्येत प्रचंड थकवा जाणवतो. जुलाब सुरू होतात. खाणेही कठिण होऊन बसते. वेळीच लक्ष न दिल्यास ही समस्या गंभीर होऊ शकते. फूड पॉयजनिंगची लक्षणे कोणती ते जाणून घेवूयात.
ही आहेत लक्षणे
1 लूज मोशन
अनेकदा फूड पॉयजनिंग झाल्यास लूज मोशन होते.
2 पोटात गाठी
जर काही खाल्यानंतर पोटात जोरात वेदना होत असतील आणि पोटाच्या आजूबाजूला गाठी झाल्यस वेळीच डॉक्टरांकडे जा.
3 उलटी, पोटदुखी
काही खाल्यानंतर उलटी होणे, पोटात दुखणे असा त्रास होत असेल तर हे फूड पॉयजनिंगमुळेही होऊ शकते.
4 डिहायड्रेशन, कमजोरी
लूज मोशनमुळे डिहायड्रेशनची समस्या होऊ शकते. तसेच चक्कर, थकवा आणि कमजोरी जाणवू शकते.
5 ताप
फूड पॉयजनिंगनंतर शरीर गरम होऊ लागते. ताप आल्यासारखे वाटू लागते. जास्त ताप असल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या.
Visit : arogyanama.com