आरोग्यनामा ऑनलाइन – हेपेटायटिस बी हा आजार एचआयव्हीपेक्षाही घातक ठरु शकतो. एका संशोधनानुसार जगातला प्रत्येक १२वा व्यक्ती या आजाराची शिकार असतो. हा आजार सर्वात वेगाने पसरणाऱ्या आजारांपैकी एक आहे. हेपेटायटिस बॅक्टेरियाने पसरणारं इन्फेक्शन हे थेट लिव्हरवर होतं. हे इन्फेक्शन पाच प्रकारचं असतं. त्यास ए, बी, सी, डी आणि ई म्हणतात. जगभरात सर्वात जास्त लोक हेपेटायटिस-बी आणि हेपेटायटिस-सी ने ग्रस्त आहेत.
हेपेटायटिस बी एचआयव्हीच्या तुलनेत ५० ते १०० टक्के अधिक घातक असतो. कारण हेपेटायटिस-बी चा बॅक्टेरिया शरीराच्या बाहेरही कमीत कमी सात दिवसांपर्यंत जिवंत राहून निरोगी व्यक्तीला प्रभावित करु शकतो. पण वेळेवर जर या आजाराच्या लक्षणांची ओळख पटवली तर, जीव वाचू शकतो. हेपेटायटिसचे जेवढे घातक व्हायरस आहे त्यातील व्हायरस बी सर्वात घातक मानला जातो.
हा व्हायरस एका व्यक्तीतून दुसऱ्या व्यक्तीमध्ये एकतर संक्रमित सुई किंवा असुरक्षित लैंगिक संबंधामुळे पसरतो. हा व्हायरस शरीरातून पूर्णपणे नष्ट होऊ शकत नाही. पण औषधांच्या माध्यमातून नियंत्रणात ठेवता येतो. हेपेटायटिस बी फार शांतपणे अटॅक करतो आणि व्यक्तीला ते कळत नाही. यामुळं नकळतपणे हा व्हायरस एका व्यक्तीतून दुसऱ्या व्यक्तीच्या शरीरात जातो. सांधेदुखी, पोटदुखी, उलटी आणि कमजोरी वाटणे, नेहमी थकवा जाणवणे. त्वचेचा रंग पिवळा होतो आणि डोळ्यांचा पांढरा भागही पिवळा होतो, ताप येतो आणि लघवीचा रंगही गर्द होतो, भूक कमी लागते, ही हेपेटायटिसची लक्षणं आहेत. हा आजार टाळण्यासाठी सुरक्षित लैंगिक संबंध ठेवा. एकापेक्षा जास्त पार्टनरसोबत शारीरिक संबंध नका ठेवू नये, दुसऱ्या कुणाशीही सुई, रेजर, टूथब्रश इत्यादी गोष्टी शेअर करु नये, हेपेटायटिस बी आणि सी दुषित पदार्थ, पाणी किंवा इन्फेक्टेड रुग्णाला गळाभेट, चुंबन किंवा सोबत जेवल्याने होत नाही.