आरोग्यनामा टीम – जर तुम्ही अनियमित आहार घेत असाल तर याचा तुमच्या लिव्हरवरदेखील प्रभाव पडत असतो. यामुळं तुम्हाला लिव्हर सिरोसिस हा आजार होऊ शकतो. त्यामुळं योग्य आहार घेणं खूप गरजेचं आहे. आहार नीट नसेल तर लिव्हरवर कसा परिणाम होतो याबद्दल आज आपण माहिती घेणार आहोत.
लिव्हर सिरोसिस
लिव्हर सिरोसिस या आजारात लिव्हरचा आकार आकुंचन पावतो. ही प्रक्रिया इतकी नकळत होते की, शरीरातील पेशी सुद्धा खराब होतात. त्यामुळं काळजी घेणं खूप गरजेचं आहे.
कशी उद्भवते ही समस्या ?
– अल्कोहोलचं जास्त प्रमाणात सेवन
– अनियमित आहार
– जास्त फॅट्स असलेल्या पदार्थांचं सेवन
– व्यायामाचा अभाव
– जंक फूडचं अतिसेवन
सिरोसिसची लक्षणं काय आहेत ?
– भूक कमी लागणं
– झोप न येण्याची समस्या
– हृदयाचे ठोके वाढणे
– स्नायू दुखणं
– हातांचे पंजे लाल होणं
– नाकातून रक्त येणं
काय करावेत उपाय ?
1) आवळा – जर तुम्हाला लिव्हर सिरोसिसची समस्या आली तर तुम्ही आवळ्याचा वापर करू शकता. आवळा शरीरातील टॉक्सिन्स बाहेर टाकण्यासाठी खूप फायदेशीर ठरतो. आवळ्यात व्हिटॅमिन सी मोठ्या प्रमाणात असतं. जर तुम्ही रोज 3-4 आवळे खाल्ले तरीही तुमचं आरोग्य दीर्घकाळ चागलं राहू शकतं. तुम्ही इतर अनेक प्रकारे देखील आवळ्याचं सेवन करू शकतं.
2) हळद – आपल्या शरीराला हळदीचे अनेक फायदे होतात. यात औषधी गुण मोठ्या प्रमाणात असल्यानं तुम्हाला अनेक आजारांपासून दूर राहण्यासाठी मदत होते. यासाठी रोज रात्री हळदीचं दूध प्यायला हवं. यात रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारे अनेक घटक असतात. हळदीचा वापर हॅपेटाइटिस बी सारख्या समस्या कमी करण्यासाठी जास्त फायदेशीर ठरतो.
3) व्हिनेगर – इंफेक्शनपासून वाचण्यासाठी याचा खूप फायदा होतो. नियमित जर व्हिनेगरचं सेवन केलं तर तुम्ही तंदुरुस्त राहू शकता. जर एक ग्लास पाण्यात एक चमचा अॅप्पल साईडर व्हिनेगर आणि मध मिसळून याचं सेवन केलं तर शरीरातील विषारी पदार्थ बाहेर टाकण्यास मदत होते.
टीप – वरील लेख हा माहिती म्हणून देण्यात आलेला आहे. त्यामुळं काहीही करण्याआधी एकदा डॉक्टरांचा किंवा तज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्या. कारण काही गोष्टी काहींना सूट होतात तर काहींना सूट होत नाहीत. तसेच काही लोकांना काही पदार्थांची अॅलर्जीही असते. त्यामुळं तुम्हाला अॅलर्जी असणारे पदार्थ वापरणं टाळावं.