आरोग्यनामा ऑनलाईन टिम- स्विमिंगमुळे वजन जलदगतीने कमी होण्यास मदत होते. स्विमिंग केल्याने शरीरातील कॅलरी बर्न होण्यास मदत होते. तसेच याचे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत. उन्हाळ्यात अनेक जण स्विमिंग करण्याला पसंती देतात. वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी स्विमिंग करण्यास सुरूवात करावी. अनेक सेलिब्रिटीही फिटनेससाठी स्विमिंगचा आधार घेतात.
हेल्दी डाएट आणि प्रत्येक दिवशी स्विqमग केल्यास वजन लवकरच कमी होते. स्विमिंग एक कार्डियोवॅस्कुलर एक्सरसाइज असून पाण्यामध्ये वजन कमी जाणवते. त्यामुळेच एकत्रच पूर्ण शरीरावर काम करण्यासाठी मदत होते. त्याचबरोबर स्विमिंग करताना सांध्यांवर कोणताही दबाव येत नाही. बटरफ्लाय स्विमिंग स्टोक सर्वात कठिण तेवढच प्रभावी आहे.
बटरफ्लाय स्टोकमुळे अध्र्या तासामध्ये जवळपास ४५० कॅलरी बर्न होऊ शकतात. हा स्टोक शरीराचा पोस्चर, लचीलापन, अप्पर बॉडी स्टेंथमध्ये सुधारणा आणण्यासोबतच संपूर्ण बॉडि टोन करण्यासाठीही मदत होते. स्टोक कमजोर पाठ असणाऱ्यांसाठी अत्यंत फायदेशीर असून हे पाठीच्या स्नायूंसोबतच कंबरेचे स्नायू मजबुत करते. १० मिनिटांसाठी फ्रीस्टाइल स्टोक केल्याने १०० कॅलरी बर्न होतात. बॅकस्टोक आणि ब्रेस्ट स्टोक थोडासे वजन कमी करण्यासाठी मदत करतो. याचे इतरही अनेक फायदे आहेत.
ब्रेस्ट स्टोकमुळे हृदय आणि फुफ्फुसांचे आरोग्य चांगले राहते. यामुळे श्वासाच्या समस्या दूर होतात. बॅक स्टोक मणक्यासाठी आणि कंबरेसाठी खूप लाभदायक आहे. स्विमिंग करण्यापूर्वी दोन तास अगोदर पोटभर नाश्ता करू नका. स्विमिंग कॅम्प्स वापराव्यात. स्विमिंग पुलच्या पाण्यामध्ये क्लोरिन असल्याने बाहेर आल्यानंतर आंघोळ केली पाहिजे.