आरोग्यनामा ऑनलाईन टीम – अनेक पुरुष स्वप्नदोष या आजराने त्रस्त असतात. त्यांना धातू जाणे, शुक्रक्षीणता अशा अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. यामुळे पुरुषांना अशक्तपणा येतो. अंगात उष्णता जास्त असल्यास चहा, तंबाखू आदी व्यसनांमुळे शरीराचा क्षोभ होत असल्यामुळे असे घडण्याची शक्यता असते. त्यामुळे असे न होण्यासाठी काय उपाय करावेत. हे आपण आज जाणून घेणार आहोत.
१) तुम्हाला जर वारंवार स्वप्नदोषामुळे किंवा हस्तमैथुनामुळे अशक्तपणा येत असल्यास चंद्रप्रभा या गोळ्या सकाळ, संध्याकाळ घ्याव्यात. असे केल्याने तुमची या समस्येपासून सुटका होईल.
२) पोटात वायू धरण्याची तक्रार असणे, अजीर्ण होणे किंवा रात्री उशिरा आणि जास्त जेवणे यामुळे स्वप्नदोष होत असल्यास सायंकाळी लंघन करावे. यामुळे तुमची स्वप्नदोषची समस्या नियंत्रणात येईल.
३) अशी समस्या उद्भवल्यास रात्री १ चमचा जिरे ठेचून एक कप पाण्यात भिजत टाकून हे सकाळी खावे आणि तेच पाणी प्यावे. यामुळे तुमची स्वप्नदोषची समस्या नियंत्रणात येण्यास मदत होईल.
४) तुमची ही समस्या जो पर्यंत जात नाही तोपर्यंत तुम्हाला अजिबात स्वस्थता जाणवत नाही. या समस्येने त्रस्त आहेत त्यांनी जेवण झाल्यानंतर शतपावली करावी.
५) ही समस्या जाण्यासाठी सात्विक आहार, मूग, जुने तांदूळ, ज्वारीची भाकरी, फळभाज्या, गायीचे दूध, गोड ताक, कोथिंबीर, आले यांची चटणी, फळे, मनुका खावे. जेणेकरून तुमची ही समस्या नियंत्रणात येण्यास मदत होईल.