आरोग्यानामा ऑनलाईन टीम : ग्रीन टी तर सर्वांनाच माहिती आहे. परंतु, अनेकांना रेड टी माहित नसतो. ग्रीन टी इतकाच तो लोकप्रीय आहे. ग्रीन टी आवडत नसल्यास हा घेऊ शकता. मात्र, गर्भवती महिला किंवा बाळांना ब्रेस्टफिड करण्याऱ्या महिलांनी रेड टी घेऊ नये. याचे फायदे आणि कृती जाणून घेवूयात.
असा तयार करा
तीन कप डाळिंबांच्या बिया घ्या. या बीया एक कप साखरेसोबत बारीक करुन घ्या. हे मिश्रण गाळून घ्या. हे मिश्रण साठवूनही ठेवता येते. त्यानंतर एक चतुर्थांश कप मिश्रण घ्या, त्यात गरम पाणी मिसळा. थोडे मध घालूनही घेऊ शकता.
हे आहेत फायदे
१ वजन आणि पोटावरील चरबी कमी होते.
२ हृदय निरोगी ठेवण्यात मदत होते.
३ कॅन्सरसारख्या गंभीर आजारांशीही सामना करता येतो.
४ पचनक्रिया सुधारते.
५ पोटाशी निगडीत समस्या होत नाहीत.
Visit : arogyanama.com