आरोग्यनामा ऑनलाईन टीम – शरीरातील गॅस सोडणे (फार्ट किंवा पादणे) ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे. अनेक लोकांना या मागील शास्त्रीय कारण माहित नसल्याने ते यावर हसतात. म्हणूनच या नैसर्गिक गोष्टीला शरमेची बाब मानले जाते. एक व्यक्ती दररोज सरासरी अर्धा लिटर गॅस हा फार्टच्या माध्यामातून बाहेर सोडतो. गॅस रोखून धरल्यास फार गंभीर दुष्परिणाम होऊ शकतात. कारण यामुळे गॅस शरीरात फिरु लागतो आणि अन्य जागेतून बाहेर निघतो.
हे लक्षात ठेवा
1 आपण जे अन्न खातो त्यामध्ये सल्फर असते. पचनप्रक्रियेत या सल्फरपासून हायड्रोजन सल्फाइड गॅस तयार होतो. यामुळे घाण वास येतो. फार्टमधून फारच घाण वास येत असेल तर पचनक्रियेवर लक्ष दिले पाहिजे.
2 अनेकदा गॅस सोडताना घाण वास येत नाही. कारण ही ती हवा असते जी श्वास घेत असताना फुफ्फुसांपर्यंत पोहोचलेली असते.
3 सेवन केलेल्या अन्नाची पचनक्रिया झाल्यावर त्यातून काही गॅस निघतो. हा गॅस फार्टच्या माध्यमातून बाहेर पडतो.
4 फार्ट करत असताना आवाज होणे हे शरीरातील गॅसचे प्रमाण, त्याची इंटेसिटी आणि तुमच्या बॉडी पॉश्चरवर अवलंबून असते.