आरोग्यनामा ऑनलाईन- आपण अशा अनेक गोष्टी सेवन करतो ज्यामुळे लिव्हर हळुहळु कमजोर होत जाते. लिव्हर अचानक खराब होत नाही. उलट याच्या संबंधीत समस्यांचे संकेत अगोदर दिसून येतात. लिव्हर शरीराचे वर्कहाऊस आहे. ते जेवणातील वसा आणि कार्बोहायड्रेट शुद्ध करते. ते नॅचरलफिल्टर आहे, जे विषारी पदार्थ बाहेर टाकण्यास मदत करते. शरीरासाठी उपयोगी प्रोटीन येथे तयार होते आणि पचनासाठी उपयोगी पित्ताचा स्त्रावसुद्धा लिव्हरमध्येच असतो.
लिव्हरच्या या संकेताकडे करू नका दुर्लक्ष
1 त्वचा, नख, लघवी आणि डोळ्यांचा पिवळेपणा.
2 बाईल (पित्त) एंजाइम तोंडापर्यंत येते, ज्यामुळे तोंड कडू होते.
3 सतत धडधडणे, उलटीची समस्या होते. हे पित्तामुळे होते.
4 पोटात सूज आणि जडपणा जाणवणे.
5 सतत आळस, कोणत्याही कामात मन न लागणे आणि झोपेची समस्या.
6 सतत गोंधळलेले राहणे, विसरण्याची समस्या.
लिव्हर चांगल्या ठेवण्यासाठी टिप्स
1 जास्त मीठ सेवनाने रक्तदाबासह लिव्हरची सुद्धा हानी होते.
2 ज्यांच्या शरीराचा खालील भाग जड होतो, ते सामान्यपणे नॉन-अल्कोहलिक फॅटी लिव्हर डिसीजने पीडित असतात.
3 उशीरापर्यंत एकाच जागेवर बसू नका. यामुळे नॉन अल्कोहलिक फॅटी लिव्हरचा धोका वाढतो. सक्रिय राहावे.
4 जास्त साखर, मीठाचे सेवन करू नका. 35 वयानंतर लिव्हर फंक्शन टेस्ट करावी. लिव्हरमध्ये एलानाइन आणि एसपारटेट एंजाइम्सचा वाढलेला सीरम स्तर गडबडीचा संकेत आहे.
काही गोष्टी काहींना सूट होतात तर काहींना सूट होत नाहीत. तसेच काही लोकांना काही पदार्थांची अॅलर्जीही असते. त्यामुळं तुम्हाला अॅलर्जी असणारे पदार्थ वापरणं टाळावं.