आरोग्यनामा ऑनलाइन टीम – हवामान कोणते पण असो ओठ फुटण्याची समस्या कायम असते. ओठांमध्ये ओलावा नसणे हे यामागील एक कारण आहे. यामुळे ओठ फुटू लागतात. बर्याच वेळा, त्यांच्यातील रक्तस्त्रावामुळे असह्य वेदना देखील होतात. चांगल्या आहाराबरोबरच, आपण त्यामध्ये ओलावा ठेवण्यासाठी काही विशेष उपाय देखील अवलंबू शकता. हे आपल्या ओठांचा कोरडेपणा काढून मऊ आणि गुलाबी होण्यास मदत करेल.
मलेरिया तापामुळे यकृताचे नुकसान होऊ शकते; जाणून घ्या लक्षणे आणि प्रतिबंध
उन्हाळ्यात ओठांची काळजी घ्या
१) ओठ घासू नका, मेकअप रीमूव्हरने स्वच्छ करा. कोरडेपणा हे ओठ फूटण्याचे मुख्य कारण आहे.
अशावेळी लिपस्टिक काढताना ओठ घासणे टाळा. असे केल्याने ओठ आणखी कोरडे होतात. ओठ साफ करण्यासाठी मेकअप रीमूव्हर वापरणे चांगले आहे. आपण इच्छित असल्यास यासाठी आपण ओठांवर नारळ, बदाम, ऑलिव्ह ऑईल इत्यादीचा वापर करू शकतात.
Coronavirus : शरीरातील ऑक्सिजन लेव्हल कमी होतेय? जाणून घ्या कधी येते हॉस्पीटलमध्ये जाण्याची वेळ
२) व्हॅसलीन किंवा लिप बाम लावा
बर्याचदा उन्हाळ्यात त्वचेसोबत ओठांमध्ये कोरडेपणा वाढू लागतो. यामुळे ओठांवरील नैसर्गिक तेल कमी होऊन डिहायड्रेशनची समस्या वाढते. आणि ओठ फाटण्यास सुरूवात होते. हे टाळण्यासाठी नेहमी व्हॅसलीन किंवा लिप बाम लावा.
३) ब्रशने ओठ स्वच्छ करा
प्रत्येकजण दात स्वच्छ करण्यासाठी दात घासतो. परंतु आपण त्याच ब्रशने ओठांचे सौंदर्य देखील वाढवू शकता. ब्रश केल्यानंतर हलक्या हातांनी ओठांवर घासून घ्या. यामुळे ओठांवरील मृत त्वचेचा थर निघून जाईल. तसेच ओठांच्या मालिशमुळे ओठांमध्ये रक्ताचा प्रवाह वाढेल.
Coronavirus : घरात कोरोना रुग्ण असल्यास कोणती काळजी घ्यावी?, जाणून घ्या
४) झोपायच्या आधी ओठांची मालिश करा
रात्रीच्या वेळी ओठांची काळजी घ्या. यासाठी झोपेच्या आधी ओठांवर व्हॅसलीन, लिप बाम किंवा कोणतेही नैसर्गिक तेल लावा. २०-३० सेकंद ओठांची मालिश करा. यामुळे ओठांना ओलावा मिळेल.
सर्व ज्येष्ठांना व्हॅक्सीन दिल्यास देश मिळवू शकतो कोरोनापासून बचाव करण्याचे सुरक्षा कवच
५) चहा आणि कॉफी कमी प्या
चहा, कॉफी इत्यादी गरम गोष्टींचे सेवन केल्याने ओठ खराब होऊ शकतात. अशा परिस्थितीत ते जास्त गरम प्यावे.