साखर करते विषाप्रमाणे काम, खाल्ल्याने होऊ शकते ‘हे’ नुकसान

आरोग्यनामा ऑनलाइन टीम – साखरेचे गोड पदार्थ खाण्याची खूपच सवय असेल तर ते एखाद्या व्यसनाप्रमाणेच ठरू शकते. कारण व्यसनामुळे होणारे दुष्पपरिणाम जेवढे गंभीर असतात, तेवढेच साखरेमुळे होणारे दुष्परिणामही गंभीर असतात. युनिव्हर्सिटी ऑफ कॅलीफोर्नियाच्या संशोधकांचे म्हणणे आहे की, साखर शरीरासाठी नुकसानदायक असल्याने ज्या पदार्थांमध्ये साखरेचे प्रमाण जास्त असते अशा सर्व उत्पादनांवर कर आणि कायदेशीर बंधन असणे आवश्यक आहे.

हे नुकसान  होते

* साखरेमुळे रक्तदाब वाढतो.

* हार्मोन संतुलन बिघडून लिव्हरलचेसुद्धा नुकसान होऊ शकते.

* साखर लठ्ठपणाचे मुख्य कारण आहे.

जंक फूड, कोला

जंक फूडमध्ये साखरेचे प्रमाण जास्त असते. कोला पिण्यापूर्वी या गोष्टीचा अवश्य विचार करा. एक कोलामध्ये १० चमचे साखर असते. या व्यतिरिक्त चॉकलेट, केक, बिस्कीट यासारख्या पदार्थांमध्येही साखरेचे प्रमाण जास्त असते.

शुगर फ्री प्रॉडक्टही धोकादायक

कृत्रिम गोड पदार्थांचा पर्याय आरोग्यासाठी ठीक नाही. यामुळे वजन कमी होण्याऐवजी वाढते. कारण अशाप्रक्राच्या साखरेच्या कॅलरीमुळे व्यक्ती भुकेबद्दल अचेत राहून जास्त कॅलरी घेतो. यामुळे कोणत्या प्रकारच्या शुगर फ्री पदार्थांचे आपण सेवन करत आहोत, हे जाणून घेणे आवश्यक आहे.