आरोग्यनामा ऑनलाईन- नवी दिल्ली : वैद्यकीय भाषेत शास्त्रज्ञ सांगतात की, स्मरणशक्ती तेव्हा कमी होते जेव्हा मेंदूत एमिलॉयट बीटा नावाच्या प्रोटीनचा स्तर वाढतो, जो नियंत्रित ठेवणे आवश्यक आहे. हे प्रोटीन वाढत्या वयासोबत वाढते. परंतु कमी वयात सुद्धा स्मरणशक्ती कमजोर होऊ शकते. स्मरणशक्ती तल्लख ठेवण्यासाठी वर्कआऊट आणि डाएट दोन्ही जबाबदार आहे. डाएटमध्ये कोणत्या वस्तूंचा समावेश केल्याने स्मरणशक्ती चांगली राहते, ते जाणून घेवूयात…
1 पालकचे सेवन करा :
पालकमध्ये आयर्न, मॅग्नेशियम आणि पोटॅशियम भरपूर प्रमाणात आढळते, जे स्मरणशक्ती वाढवते आणि शिकण्याची क्षमता वाढवते. पालकातील व्हिटॅमिन बी 6, ई आणि फोलेट हे अल्जायमर आणि स्मरणशक्ती कमजोर होण्यापासून वाचवते.
2 मासे सेवन करा :
शास्त्रज्ञांनी सुद्धा हे स्पष्ट केले आहे की मासे सेवन केल्याने स्मरणशक्ती वाढते. फिश ऑईलमध्ये ओमेगा-3 फॅटी अॅसिड असते जे मुलांचा मेंदू आणि डोळ्यांच्या विकासात उपयोगी असते. फॅटी फिशमध्ये ओमेगा-3 ची मात्रा भरपूर असल्याने याच्या सेवनाने बुद्धी वाढते.
3 कॉफीचे सेवन करा :
कॉफीत कॅफीन आणि अँटीऑक्सीडेंट असते जे स्मरणशक्ती मजबूत करते. एकाग्रता वाढवते, मेंदूला जास्त सतर्क बनवते. मर्यादित प्रमाणात कॉफीचे सेवन केल्यास स्मरणशक्ती मजबूत होते, शिवाय न्यूरोलॉजिकल डिसीज दूर राहतील.
4 डार्क चॉकलेट सेवन करा :
डार्क चॉकलेट खाल्ल्याने स्मरणशक्ती वाढते. कोकोमध्ये फ्लॅवोनॉयड्स नावाचे अँटीऑक्सीडेंट्स असते जे मेंदू निरोगी ठेवते.
5 हिरव्या भाज्या :
हिरव्या भाज्यांमध्ये भरपूर अँटीऑक्सीडेंट्स असतात. यात कॅरोटेनॉयड्स तत्व असते जे मेंदूची शक्ती वाढवण्यास मदत करते. हेल्थ एक्सपर्ट स्मरणशक्ती वाढवण्यासाठी ब्रोकली, कोबी आणि अंकुरित भाज्या खाण्याचा सल्ला देतात.
काही गोष्टी काहींना सूट होतात तर काहींना सूट होत नाहीत. तसेच काही लोकांना काही पदार्थांची अॅलर्जीही असते. त्यामुळं तुम्हाला अॅलर्जी असणारे पदार्थ वापरणं टाळावं.