आरोग्यनामा ऑनलाईन- अनेकांनी गुळ आणि चणे (फुटाणे) एकत्र खाण्याचा प्रयोग अद्याप कधी केला नसेल. यात व्हिटॅमिन बी 6 भरपूर असतं. या दोन्ही घटकांच्या सेवनामुळं स्मरणशक्ती बळकट होते. तसंच मेंदूची कार्य करण्याची क्षमता वाढते. यामुळं मुड नियंत्रित करणारे हार्मोन्स सेरोटोनिन आणि नॉरपेनाफ्रिन वाढण्यास मदत होते. यामुळं शरीरावर मनावर येणारा तणाव(stress ) कमी होतो. जर तुमचा मुड खराब असेल तर गुळ आणि चणे यांचं सेवन(stress ) आवश्यक करा.
याचे आपल्या शरीराला अनेक फायदे होतात जे खूप कमी लोकांना माहीत आहेत. आज आपण याचबद्दल माहिती घेणार आहोत.
गुळ-फुटाणे खाण्याचे फायदे पुढीलप्रमाणे –
1) केसगळती कमी होते.
2) ज्यांच्या शरीरात लोह, प्रथिने, रक्ताची कमतरता आहे त्यांना याचा मोठा फायदा होतो.
3) मासिक पाळीत महिलांनी याचं सेवन करावं.
4) रोगप्रतिकारक शक्ती वाढते
5) हृदयाचं कार्य सुरळीत चालतं.
6) अकाली दात पडण्याची समस्या दूर होते
टीप :- वरील लेख हा माहिती म्हणून देण्यात आलेला आहे. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. त्यामुळं काहीही करण्याआधी एकदा डॉक्टरांचा किंवा तज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्या. प्रोफेशनल अॅडव्हाईस म्हणून या लेखाचा वापर करू नये.
काही गोष्टी काहींना सूट होतात तर काहींना सूट होत नाहीत. तसेच काही लोकांना काही पदार्थांची अॅलर्जीही असते. त्यामुळं तुम्हाला अॅलर्जी असणारे पदार्थ वापरणं टाळावं.