नेहमीच आद्रक चहा पिणे योग्य नाही ; होऊ शकतो ‘हा’ त्रास
आरोग्यनामा ऑनलाईन : हिवाळा असो की उन्हाळा नेहमी लोक अद्रकचा चहा पिणे पसंत करतात. चहाच्या दुकानावर गेल्यावरही ग्राहकांकडून अद्रकाची मागणी केली जाते. पण आद्रकचा चहा पिल्यामुळे नुकसान देखील होऊ शकते.
ऍसिडिटी
अद्रक योग्य प्रमाणात घेतले तर ते लाभदायक ठरते. परंतु गरजेपेक्षा जास्त अद्रक चहा पिल्याने ऍसिडिटी होऊ शकते.
ब्लडप्रेशर
ज्या लोकांना उच्च रक्तदाबाचा त्रास आहे त्यांना योग्य प्रमाणात अद्रक चहा घेतल्याने फायदा होतो. ज्यांचा रक्तदाब कमी असतो त्यांनी अद्रक चहा जास्त प्रमाणात घेतल्यास त्यांना याचा त्रास होऊ शकतो. कारण अद्रकात रक्ताला विरघळविण्याची ताकद असते. अशामध्ये कमी रक्तदाब असणाऱ्यांचा बीपी अजूनच कमी होऊ शकतो.
मधुमेहाचा रुग्ण
अद्रकाचे सेवन रक्तातील साखर देखील कमी करतो. यामुळे मधुमेहाचे रुग्ण खास करून ज्यांची शुगर लेव्हल नेहमी कमी राहते अशांनी अद्रकाचे अधिक सेवन करणे योग्य नाही. अद्रकाचे जास्त सेवन केल्यामुळे रक्तातील साखरेची पातळी कमी होऊ शकते ज्यामुळे हाइपो ग्लाइसीमियाची परिस्थिती निर्माण होऊ शकते.
झोप न लागणे
रात्री अद्रक चहा पिला नाही पाहिजे. काही लोक असा विचार करतात की रात्री अद्र्काच्या चहाचे सेवन चांगले असते. तज्ञ सांगतात की रात्री अद्रकाचा चहा पिल्यामुळे झोप लागत नाही.
छातीत जळजळ
चहामध्ये अद्रक टाकल्यामुळे चहाची चव चांगली होते आणि पचन देखील सुधारते पण काही लोक चहा मध्ये गरजेपेक्षा जास्त अद्रक टाकतात. यामुळे छातीमध्ये जळजळ होऊ शकते.