आरोग्यनामा ऑनलाईन टीम – जड पाणी आणि क्षारयुक्त पाण्यापासून तयार झालेले पदार्थ आहारात घेतल्यानंतर किडनी स्टोन होतो. किडनी, मुत्राशय यामध्ये स्टोन होणे हा आजार सध्या खूपच वाढत चालला आहे. विविध रसायनापासून तयार झालेले छोटेछोटे कण एकत्र जमा झाल्यानंतर किडणी स्टोन तयार होतो. कॅल्शियम फॉस्फेट, कॅल्शियम ऑक्सोलेट, यूरिक अॅसिड, आणि अमोनियम फॉस्फेट यासारख्या रसायनांपासून हा स्टोन तयार होतो. हा झाल्यानंतर डॉक्टरांकडे गेल्यास ऑपरेशन हाच पर्याय सांगितला जातो. मात्र, आयुर्वेदात यावर अनेक प्रभावी उपाय आहेत.
ही आहेत लक्षणे
* पोटात आचानक कळ निघणे.
* सातत्याने पोट दूखणे, जळजळ होणे.
* उलटी होणे. लघवीसोबत रक्त येणे याला हिमेटूरिया म्हटले जाते.
* वारंवार लघवी येणे ही स्टोन होण्याची लक्षणे आहेत.
हे उपाय करा
* द्राक्ष आणि तरवटाच्या बी प्रत्येकी ६ ग्रॅम घेऊन बारीक वाटून घ्या. नंतर हे मिश्रण गरम पाण्यात ३० मिनिटे उकळून घ्या. हे मिश्रण थंड झाल्यानंतर दिवासातून कमीत-कमी दोन वेळेस प्यायल्यानंतर स्टोनपासून सुटका मिळू शकते.
* जळजळ होत असेल तर गुळवेल आणि आवळ्याचे मिश्रण तयार करा. यामध्ये आदरक पाच ग्रॅम, अश्वगंधा पाच ग्रॅम टाका. हे मिश्रण १०० मिली लीटर पाण्यात उकळून घ्या. हा काढा दोन दिवसाच्या आतंराने दोन महिने प्यायल्यानंतर किडनी स्टोन बरा होतो.
* दुर्वा च्या मुळ्या, अंबी हळदीचे कंद, मालकांगनीची पाने समान मात्रेत घ्यावीत. याला बारीक वाटून या मिश्रणाचा रस तयार करा. हे मिश्रण मधासोबत घेतल्यानंतर स्टोन बरा होतो.
* अश्वगंधा नवस्पतीचा रस प्यायल्यानंतर स्टोन बरा होतो. अश्वगंधा वनस्पतीच्या मुळ्याचा रस व आवळ्याचा रस समप्रमाणात घ्या. मूत्राक्षय आणि लघवी करताना होणारा त्रास होणार नाही.