आरोग्यनामा ऑनलाइन टीम – अॅपल साइडर व्हिनेगर हे सफरचंदाच्या गरापासून तयार करण्यात येणारे व्हिनेगरयुक्त औषध आहे. हे औषध विविध आजारांवर गुणकारी ठरते. या व्हिनेगरचा वापर केल्यास छोट्या-छोट्या आजारांसाठी डॉक्टरकडे जाण्याची गरज नाही. रोज याचे सेवन केल्यास विविध आजारावर मात करता येते. अॅपल साइडर व्हिनेगरचा उपाय करून कोणते आजार बरे होऊ शकतात, हे जाणून घेवूयात.
हे आहेत उपाय
* जेवण केल्यानंतर पचन होत नसेल तर मधासोबत थोडे व्हिनेगर घ्यावे. यामुळे पचनक्रिया सुरळीत होते.
* अॅपल साइडर व्हिनेगरमध्ये असलेल्या पॅक्टिनमुळे कफ, गॅस, अॅसिडिटी नाहिशी होते.
* वारंवार उचकी लागत असेल तर अॅपल साइडर व्हिनेगरमध्ये थोडे पाणी टाकून प्यावे. उचकी बंद होते.
* साइनस सारख्या आजारावर पाण्यामध्ये हे व्हिनेगर मिसळून नाकात टाकल्यानंतर नाक मोकळे होते. श्वास घ्यायला त्रास होत नाही.
* अनेकांच्या शरीराच्या घामाचा वास येतो. यासाठी व्हिनेगरचा उपाय करावा. आंघोळ करण्याच्या अगोदर शरीराला हे व्हिनेगर लावावे. यामुळे घामाचा वास येत नाही.
* तोंडाचा वास येत असल्यास अॅपल साइडर व्हिनेगर पाण्यात टाकून गुळण्या कराव्यात. तोडांचा वास येणे बंद होते.
* सर्दी झाली असल्यास एक ग्लास पाण्यात थोडे आले टाकावे. तसेच मध आणि व्हिनेगर टाकून या मिश्रणाच्या गुळण्या कराव्यात.
* या व्हिनेगरचे नियमीत सेवन केल्याने व्हायरल इंफेक्शन होत नाही.
* मधुमेह नियंत्रणात राहतो.
* वजन कमी करण्यासाठीदेखील हे उपयोगी आहे. वजन कमी करण्यासाठी रोज थोडे व्हिनेगर पाण्यात टाकून प्यावे.
* हाडे मजबूत होण्यासाठी अॅपल साइडर व्हिनेगर प्रत्येक दिवशी थोडे पाण्यासोबत घ्यावे.
* मुलतानी मातीसोबत मध आणि व्हिनेगरचे मिश्रण तयार करून चेहऱ्यावर लावावे. पंधरा मिनीटानंतर चेहरा स्वच्छ धुऊन घ्यावा. चेहरा स्वच्छ करताना पाण्यात थोडे व्हिनेगर टाकावे. यामुळे काळे डाग कमी होऊन रंग उजळतो.
* चेहऱ्यावर सुरकुत्या असल्यास रात्री झोपण्यापूर्वी अॅपल साइडर व्हिनेगरमध्ये थोडे पाणी टाकून चेहऱ्याला लावावे. सकाळी चेहरा पाण्याने स्वच्छ करावा. मात्र, अॅपल साइडर व्हिनेगर नेहमी पाण्यात किंवा हर्बल टीमध्ये मिसळून प्यावे.