आरोग्यनामा ऑनलाईन- सकाळी शौचास झाले नाही तर संपूर्ण दिवस खराब होतो. अनेकजण शौचास जातात पण पोट(stomach) साफ होत नाही. अनेकजण पोट(stomach) साफ होण्यासाठी विविध उपाय करत असतात. या समस्येला बद्धकोष्टता असे म्हटले जाते. आपल्याच काही चुकांमुळे हा समस्या होते. कोणत्या सवयी टाळल्या तर ही समस्या दूर होऊ शकते ते जाणून घेवूयात…
या सवयी टाळा
1 धुम्रपान
धुम्रपान केल्याने ही समस्या होते. यामुळे फुफ्फुसं खराब होणे, पचनशक्तीवरही परिणाम होणे, अशा समस्या होतात आणि पोट साफ होत नाही.
2 कमी पाणी पिणे
कमी पाणी प्यायल्याने सुद्धा ही समस्या होते. दररोज 8 ते 10 ग्लास पाणी प्यावे. सकाळी उठल्यानंतर गरम पाण्याचे सेवन करा. तणावमुक्त राहा.
3 नाश्ता न करणे
सकाळी नाश्ता न करणे हे देखील एक कारण आहे. यासाठी रोज सकाळी हेल्दी नाश्ता करा. गोड आणि बाहेरचे पदार्थ खाऊ नका.
4 जागरण करणे
जागरण किंवा उशीरा झोपल्याने ही समस्या होते. यामुळे पचनक्रियेवर परिणाम होतो. लवकर झोपा आणि लवकर उठा.
5 व्यायाम न करणं
व्यायामाच्या अभावाने शारिरीक हालचाल पुरेशी होत नाही. यामुळे पचनशक्ती मंदावते. यामुळे ही समस्या होते.
टीप :- वरील लेख हा माहिती म्हणून देण्यात आलेला आहे. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. त्यामुळं काहीही करण्याआधी एकदा डॉक्टरांचा किंवा तज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्या. प्रोफेशनल अॅडव्हाईस म्हणून या लेखाचा वापर करू नये.
काही गोष्टी काहींना सूट होतात तर काहींना सूट होत नाहीत. तसेच काही लोकांना काही पदार्थांची अॅलर्जीही असते. त्यामुळं तुम्हाला अॅलर्जी असणारे पदार्थ वापरणं टाळावं.