आरोग्यनामा ऑनलाइन टीम – शिळे अन्नपदार्थ खाऊ नयेत, असे आपणास नेहमी सांगितले जाते, परंतु, एका संशोधनानुसार शिळा भात रात्रभर पाण्यात भिजवून दुसऱ्या दिवशी खाल्ल्यास आरोग्यासाठी लाभदायक आहे. आसामच्या अॅग्रीकल्चर युनिव्हर्सिटीने हे संशोधन केले असून या संशोधनानुसार फर्मेट केलेला भात आरोग्यासाठी उत्तम असल्याचे म्हटले आहे.
असे करा भाताला फर्मेट
१) रात्री उरलेला भात एका मातीच्या भांड्यात पाण्यात टाकून ठेवावा.
२) यामुळे भात फर्मेंट होईल.
३) सकाळी या भाताला फोडणी द्या.
४) अथवा दह्यासोबत खा.
हे आहेत फायदे
१) शिळा भात फर्मेंट केल्याने लोहाचे प्रमाण सुमारे ७० टक्क्याने वाढते.
२) शरीराचे तापमान संतुलित राहते.
३) यातून शरीराला पौष्टिक घटक मिळतात.
४) भात फर्मेंट केल्याने यातील सोडियम, पोटॅशियम, कॅल्शियमचे प्रमाणही वाढते.
५) यातील ऊर्जायुक्त तत्त्वामुळे दिवसभर स्फूर्ती राहते.
६) यातील फायबर्समुळे बद्धकोष्ठता, अल्सरसंबंधी त्रास दूर होतात.