आरोग्यनामा ऑनलाईन टीम – पालक भाजीचे वनस्पतिक नाव स्पीनेसिया ओलेरेसिया असे आहे. हिमोग्लोबिन वाढविण्यासाठी पालक गुणकारी पालेभाजी आहे हे सर्वांनाच माहित आहे. मात्र, पालकामध्ये या व्यतिरिक्त आणखी औषधी गुण आढळून येतात. १०० ग्रॅम पालकामध्ये २६ किलो कॅलरी उर्जा, प्रोटीन २.०टक्के, २.९ टक्के, वसा ०.७ टक्के आणि रेशे ०.६ टक्के तसेच कॅल्शियम, फॉस्फरस, क्लोरिन, लोह आणि जीवनसत्त्व ए, बी, सी आणि इ भरपूर प्रमाणात असते.
हे आहेत रामबाण उपाय
* पालकाच्या पानांचा रस आणि नारळाचे पाणी समान मात्रेमध्ये मिसळून सकाळ संध्याकाळ घेतल्यास यामुळे मुतखडा विरघळून बाहेर पडेल.
* कच्चा पालकही खूप गुणकारी आहे. यामुळे पाचन तंत्र व्यवस्थित राहते. खोकला किंवा फुप्फुसामध्ये सुज असल्यास पालकाच्या रसाने गुळण्या केल्यास लाभ होईल.
* कावीळ झालेल्या रुग्णाला पालकाचा आणि कच्च्या पपईचा रस एकत्र दिल्यास आराम मिळेल.
* लो ब्लडप्रेशरच्या रुग्णांनी दररोज पालकाच्या भाजीचे सेवन करावे. यामुळे रक्तर प्रवाह नियंत्रित राहण्यास मदत होते.
* थायरॉइडचा त्रास असल्यास एक ग्लास पालकाच्या रसामध्ये एक चमचा मध आणि एक चतुर्थांश जिरे चूर्ण टाकून सेवन केल्यास लाभ होईल.
* पालकाच्या रसाने गुळण्या केल्याने दातांच्या समस्या दूर होतात, तोंडाची दुर्गंधी दूर होते.
* एनिमिया किंवा शरीरात रक्ताची कमतरता असेल्यास दररोज पालकाचा एक ग्लास रस अवश्य घ्यावा.
* हृदयाचा आजार असलेल्या लोकांनी दररोज एक कप पालकाच्या रसाचे २ चमचे मध टाकून सेवन करावे.
* ताज्या पालकाचा रस दररोज पिल्यास स्मरणशक्ती वाढते. यामध्ये आयोडीन असल्यामुळे मेंदूवरील ताण कमी होतो.