आरोग्यनामा ऑनलाइन टीम – ब्लडप्रेशर हा आजार सध्या वाढत चालला आहे. भारतात या आजाराच्या रूग्णांची संख्या जास्त असल्याचे जागतिक आरोग्य संघटनेच्या आकडेवारीवरून दिसून येते. कामाचा अतिरिक्त ताण, फास्ट फूड आणि अनियमित दिनचर्या ही या आजाराची प्रमुख कारणे आहेत. ब्लडप्रेशरमुळे हृदयाचे आजारही होऊ शकतात. ब्लडप्रेशरच्या रुग्णाला दररोज औषधे घ्यावी लागतात. काही घरगुती रामबाण उपाय केल्यास ब्लडप्रेशर नियंत्रणात राहू शकतो.
हे उपाय करा
१) विलायचीचे नियमित सेवन केल्यास ब्लडप्रेशर व्यवस्थित राहते. याच्या सेवनाने शरीराला अँटीऑक्सीडेंट मिळतात तसेच रक्तप्रवाह सुरळीत राहतो.
२) दररोज आवळ्याचे सेवन केल्यास ब्लडप्रेशर नियंत्रणात राहते. आवळ्यामध्ये व्हिटॅमिन सी असते. यामुळे रक्तप्रवाह सुरळीत राहतो आणि कॉलेस्टेरॉलही नियंत्रणात राहते.
३) दालचिनीच्या सेवनाने ब्लडप्रेशर नियंत्रणात राहते. एवढेच नाही तर दालचिनी रक्तप्रवाह नियमित ठेवते.
४) मुळा खाल्ल्याने ब्लडप्रेशर नियंत्रणात राहते. मुळ्याची भाजी करून किंवा कच्चा खाल्ल्यास शरीराला मिनरल्स आणि योग्य प्रमाणात पोटॅशियम मिळते.
५) कांद्याच्या नियमित सेवनाने कॉलेस्टेरॉल नियंत्रणात राहते. यामध्ये क्योरसेटिन नावाचे तत्व असते.
६) ब्लडप्रेशरच्या रुग्णांसाठी लसूण अमृतासमान औषधी आहे. ब्लडप्रेशरच्या डायलॉस्टिक आणि सिस्टॉलिक कार्यप्रणालीला आराम मिळतो. यामुळे ब्लडप्रेशरच्या रुग्णांनी दररोज लसणाची एक पाकळी अवश्य खावी.
७) शेवग्यात भरपूर प्रमाणात प्रोटीन आणि व्हिटॅमिन तसेच खनिज लवण आढळून येतात. या झाडाच्या पानांचा अर्क पिल्यास ब्लडप्रेशरच्या डायलॉस्टिक आणि सिस्टॉलिक कार्यप्रणालीवर प्रभाव पडतो. ब्लडप्रेशरच्या रुग्णाने मसूरच्या डाळीसोबत शेवग्याचे सेवन करावे.
८) जवसामध्ये अल्फा लिनोनेलिक अॅसिड भरपूर प्रमणात असते. हे एक प्रकारचे महत्त्वपूर्ण ओमेगा-३ फॅटी अॅसिड आहे. हायपरटेन्शनची समस्या असेल त्यांनी जेवणात जवसाचा उपयोग अवश्य करावा. यामुळे कॉलेस्टेरॉलची मात्रा कमी होते आणि याच्या सेवनाने ब्लडप्रेशर नियंत्रणात राहते.
(टिप : वरील सर्व समस्या आम्ही फक्त माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. प्रत्येक व्यक्तीची शारीरिक क्षमता वेगवेगळी असते. त्यामुळे उपाय करण्यापुर्वी तज्ज्ञांचा सल्ला घेणे फायदेशीर ठरते.)