टोमॅटो, बटाटा, सफरचंद, कोबीने दूर करा स्किन प्रॉब्लेम्स, जाणून घ्या

आरोग्यनामा ऑनलाइन टीम – मुरूम, पुरळ, डाग, वाढत्या वयामुळे पडलेल्या सुरकुत्या या सर्व समस्यांवर काही नैसर्गिक उपाय आहेत. प्राचीन काळापासून सौंदर्यवृद्धीसाठी विविध नैसर्गिक उपचार करण्यात येत आहेत. हे उपाय केल्यास त्वचेशी संबधित समस्या दूर करता येतात.

हे उपाय करा

* कमी वयात चेहरा सुरकुत्यायुक्त झाला असेल तर एक सफरचंद बारीक करून घ्या आणि त्यामध्ये थोडे दुध टाकून पेस्ट तयार करा. ही पेस्ट थोडावेळ लावून त्यानंतर चेहरा धुवून घ्या. आठवड्यातून चार वेळेस हा उपाय करावा.

* अर्धा कप पत्ता कोबीच्या रसामध्ये अर्धा चमचा दही आणि १ चमचा मध मिसळून हे मिश्रण लावा. थोडावेळाने चेहरा कोमट पाण्याने धुवून घ्या. हा उपाय केल्यास त्वचा मुलायम होईल.

* रात्री झोपण्यापूर्वी संत्र्याच्या दोन चमचे रसामध्ये २ चमचे मध मिसळून हे मिश्रण २० मिनिटं लावून ठेवा. थोडावेळाने स्वच्छ कापूस दुधामध्ये ओला करून चेहरा पुसून घ्या. दररोज हा उपाय केल्यास फरक दिसून येईल.

* दोन टोमॅटो बारीक करून त्यामध्ये तीन चमचे दही आणि दोन चमचे गव्हाचे पीठ टाका. हे मिश्रण कमीतकमी २० मिनिटं लावून ठेवल्यास सुरकुत्या कमी होण्यास मदत होईल. हा उपाय आठड्यातून दोन वेळेस करू शकता.

* एक बटाटा बारीक करून घ्या. त्यामध्ये २-३ चमचे कच्चे दुध मिसळून पेस्ट तयार करून घ्या. ही पेस्ट दररोज सकाळ-संध्याकाळ काळ्या डागांवर थोडावेळ लावून ठेवा. त्यानंतर चेहरा स्वच्छ धुवून घ्या. काळे डाग नष्ट होतील.

* विड्याचे एक पान बारीक कुटून त्यामध्ये एक चमचा खोब‍रेल तेल टाका. हे मिश्रण काळे डाग, मुरूम, पुरळवर लावा. आठवड्यातून कमीतकमी २-३ वेळेस हा उपाय केल्यास फरक दिसून येईल.