आरोग्यनामा ऑनलाइन टीम – प्राचीन पुराणांमध्ये धर्मासह आरोग्यविषयकही खूप बहुमोल माहिती देण्यात आली आहे. बदलेल्या जीवनशैलीमुळे सध्या अनेक लोकांना कमी वयातच विविध आजार होत आहेत. या आजारांना दूर करण्यासाठी गरुड पुराणात काही विशेष माहिती देण्यात आली आहे. हे उपाय नियमितपणे केल्यास अशक्तपणा, कमजोरीच्या समस्या दूर होऊ शकते. या उपायांची माहिती आपण घेवूयात.
स्मरणशक्ती
जेवण केल्यानंतर खडीसाखर आणि लोणी खाणे लाभदायक आहे. या उपायाने पुरुषांची स्मरणशक्ती वाढते आणि शरीराला उर्जा मिळते. गायीच्या दुधाचे लोणी उत्तम असते.
हिंग, काळे मीठ
हिंग, काळे मीठ आणि सुंठचा काढा करून प्यायल्यास पोटाचे आजार दूर होतात. पोट साफ आणि स्वच्छ राहिल्यास शरीर उर्जावान आणि ताकदवान होते.
गुळ खा
गरुड पुराणानुसार जर एखाद्या पुरुषाने दररोज जेवणानंतर थोडासा गुळ खाल्ल्यास भरपूर ताकद मिळते. गुळ जुना असेल तर जास्त लाभ होतो.
डोळ्यांचे आजार
त्रिफळा चूर्ण आणि मधाचे सेवन केल्यास दीर्घ काळपर्यंत डोळे निरोगी राहतात. डोळ्यांशी संबंधित छोटे-छोटे आजार दूर होतात. तुपासोबत त्रिफळा चूर्णाचे सेवन डोळ्यांसाठी अत्यंत फायदेशीर आहे.
ताकद
ज्या पुरुषाला ताकदवान होण्याची इच्छा असेल त्याने दररोज खडीसाखर, मध आणि लोणी एकत्र करून सेवन करावे. तीळ, अश्वगंधा, काळी तुळस आणि गुळ एकसमान प्रमाणात घेऊन याच्या गोळ्या तयार करा. या गोळ्यांचे सेवन केल्यास शरीराला ताकद मिळेल.
त्वचेची चमक
जवस, उडीद, गहू आणि पिप्पली बारीक कुटून त्यामध्ये तूप मिसळून हे मिश्रण शरीरावर लावा. हा उपाय नियमित केल्यास त्वचा दीर्घ काळापर्यंत चमकदार आणि स्वस्थ राहते.
तारूण्य
दीर्घ काळापर्यंत वृद्धपणा, रोग, कमजोरीपासून दूर राहू इच्छित असेल तर त्याने नियामिपणे गायीच्या दुधाचे सेवन करावे. दुधामध्ये मध आणि तूप टाकून प्यायल्यास आयुष्य वाढते.