आरोग्यनामा ऑनलाइन टीम – Soya For Male Fertility | सोया (Soya) हा आपल्या नियमित आहाराचा एक भाग आहे, तो वनस्पती-आधारित प्रोटीनचा एक समृद्ध स्रोत आहे कारण त्यात वनस्पतींचे पोषक आणि अनेक प्रकारचे अमीनो अॅसिड (Amino Acids) असतात. हे जितके विवादास्पद अन्न आहे तितकेच ते पोषक तत्वांनी समृद्ध आहे. (Soya For Male Fertility) सोया पुरूषांसाठी चांगली नाही, अशी अनेक लोकांची धारणा आहे, त्यामुळे त्याची कामवासना आणि टेस्टोस्टेरॉनची पातळी कमी होऊ लागते, त्यामुळे बरेच पुरुष ते खाण्यास टाळाटाळ करतात, शेवटी यात किती तथ्य आहे, याला काही शास्त्रीय आधार आहे का? याबद्दल तज्ञांकडून सविस्तर जाणून घेऊया (Does Soy Affect Male Fertility).
शाकाहारी लोकांना सोया आवडते
जे शाकाहारी आहेत त्यांच्यासाठी सोया प्रोटीनचा स्रोत आहे. मांस आणि अंडी (Meat, Eggs) यांसारख्या मांसाहारी पदार्थांमध्ये हे पोषक तत्व मुबलक प्रमाणात आढळते. त्यामुळे शाकाहारी लोकांसाठी सोया हा उत्तम पर्याय आहे. (Soya For Male Fertility)
पुरुषांनी सोया खावे की नाही?
आहारतज्ज्ञांनुसार, सोया खाल्ल्याने पुरुषांच्या प्रजनन क्षमतेवर परिणाम होत नाही. काही तज्ञ पुरुषांना सोया न खाण्याचा सल्ला देतात कारण त्यात फायटोएस्ट्रोजेन (phytoestrogens) असतात. हे महिला हार्मोन इस्ट्रोजेन (Estrogen) ची नक्कल करण्यासाठी ओळखले जाते. अनेक लोकांना वाटते की सोयामध्ये असलेल्या आयसोफ्लाव्होन (Isoflavone) टेस्टोस्टेरॉनची पातळी (Testosterone Level) कमी करतात, ज्यामुळे पुरुषांची प्रजनन क्षमता कमी होते.
मात्र, बर्याच संशोधनांद्वारे हे उघड झाले आहे की आयसोफ्लाव्होन (Isoflavone) आणि इस्ट्रोजेन (Estrogen)
या दोन्हीची क्रिया करण्याची यंत्रणा भिन्न आहे. त्यामुळे पुरुषांनी बेफिकीरपणे सोया खावे, जेणेकरून शरीरात प्रोटीन (Protein) ची कमतरता भासू नये.
(Disclaimer : वरील लेखामध्ये सांगितलेले विधी, पध्दती आणि दाव्यांचं आम्ही कुठलंही समर्थन करत नाही.
त्यांना केवळ सल्ला म्हणून घ्यावं. अशा पध्दतीच्या कोणत्याही उपचार / औषध / आहारावर अंमल करण्यापुर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)
Web Title :- Soya For Male Fertility | does soy affect male fertility and testosterone libido sperm count erectile dysfunction know the fact
Smelly Underarms | घामाच्या दुर्गंधीने त्रस्त आहात का? या उपायांद्वारे होईल सुटका
Raw Milk | कच्चे दूध पिणे आरोग्यासाठी लाभदायक की नुकसानकारक? जाणून घ्या काय आहे सत्य
Soup and Salad | ‘सूप आणि सलाड’चे अशाप्रकारे करू नका सेवन, फायद्याऐवजी होईल नुकसान