आरोग्यनामा ऑनलाईन –अनेकांना घशात खवखव होण्याची समस्या असते. तसं तर ही सामान्य बाब आहे. परंतु याकडे दुलर्क्ष करता कामा नये. थंडीत किंवा पावसाळ्यात हा त्रास हमखास जाणवतो. यासाठी तुम्ही काही घरगुती उपायदेखील करू शकता. आज याबद्दलच आपण माहिती घेणार आहोत.
1) वाफ – थंडीत किंवा पावसाळ्यात अनेकदा घशाचं इंफेक्शन होतं. ही सामान्य बाब आहे. यासाठी तुम्ही वाफ घेतली तर तुम्हाला घशात आराम मिळू शकतो. घरीच तुम्ही पाणी गरम करून वाफ घेऊ शकता. दिवसातून 2-3 वेळा हा उपाय केला तर इंफेक्शन कमी होतं.
2) गुळण्या – सर्दी-खोकला अशा समस्यांसाठी अनेकदा हा उपाय केला जातो. डॉक्टरही हा उपाय सुचवतात. कोमट पाण्यात मीठ टाकून जर गुळण्या केल्या तर फायदा घशाला होतो. मीठ न टाकताही तुम्ही गरम पाण्याच्या गुळण्या करू शकता.
3) गरम पेय – घसा दुखत असेल तर तुम्ही गरम पेयाचा आधारही घेऊ शकता. चहा, कॉफी किंवा सूप यांचं सेवन केलं फायदा मिळेल. जर चहात तुळस, आलं, लवंग यांचा वापर केला तर आरोग्याला जास्त फायदा मिळतो.
टीप – वरील लेख हा माहिती म्हणून देण्यात आलेला आहे. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. त्यामुळं काहीही करण्याआधी एकदा डॉक्टरांचा किंवा तज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्या. प्रोफेशनल अॅडव्हाईस म्हणून या लेखाचा वापर करू नये. काही गोष्टी काहींना सूट होतात तर काहींना सूट होत नाहीत. तसेच काही लोकांना काही पदार्थांची अॅलर्जीही असते. त्यामुळं तुम्हाला अॅलर्जी असणारे पदार्थ वापरणं टाळावं.