पुणे : आरोग्यनामा ऑनलाईन – सोनाली बेंद्रे ही एक प्रसिद्ध अभिनेत्री आहे. हम साथ साथ हे या सारख्या गाजलेल्या चित्रपटात तिने काम केले. आणि लोकांच्या मनात जागा केली. पण सोनाली बेंद्रे ला १ वर्षापूर्वी हायग्रेड कॅन्सरने ग्रासलं होत. कॅन्सरशी केलेल्या मोठ्या सामन्यानंतर ती काही महिन्यपूर्वी भारतात परतली आहे. इथे ती निरोगी राहण्यासाठी खूप प्रयत्न करत आहे. त्यासाठी ती आता अक्वाथेरेपी चा उपचार घेत आहे.
तिने नुकताच ट्विटरवर एक विडिओ शेअर केला. त्यात ती व्यायाम करतांना दिसत आहे. यातून ती तिच्या आरोग्याबद्दल किती दक्ष आहे. हे दिसत. तिला कॅन्सरने ग्रासलं होत. तरी ती अजिबात खचून गेली नाही. तिने अगदी हिमतीने कॅन्सरशी झुंज दिली. त्यामुळेच ती या आजारातून लवकर बाहेर पडली आहे. आता ती भारतात परतल्यानंतरही अनेक कार्यक्रमांना हजेरी लावत आहे.
अनेक कार्यक्रमात ती तिच्या कॅन्सरविषयी माहिती देताना दिसत आहे. त्यात ती म्हणते कि हा आजर दिसतो तितका सोपा नाही. पण सामान्य स्थितीत करण्यापेक्षा ते सोपं आहे. आणि हे थेरेपीच मला माझ्या आरोग्याच्या योग्य मार्गावर आणेल असा माझा विश्वास आहे. असं सोनाली सांगते. दरम्यान या आजाराचा सामना करताना ती सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांच्या संपर्कात होती. आणि ती आता इतरांना प्रेरणादायी संदेश देत आहे.